एक्स्प्लोर

Lonar Lake : उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला शिंदे सरकारचे खतपाणी, लोणार सरोवर संवर्धनासाठी 370 कोटी रुपये निधी मंजूर

Lonar Lake : लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी 370 कोटी रूपये निधी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई : लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी 370 कोटी रुपयांचा  निधी मंजूर करण्याचा मोठा निर्णय आजच्या  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास व संवर्धनासाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा 170 कोटी जास्त देत 370 कोटीच्या निधी  देण्याची घोषणा केली आहे .उद्धव ठाकरेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंनी मोठं खतपाणी दिल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आणि जगातील दुसरं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे.   भोवताली असलेल्या जंगलाला आता संरक्षित व धोकादायक वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराचा विकास खुंटला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराचा दौरा करुन विकासासाठी मोठ्या घोषणाही केल्या होत्या. पण वर्ष उलटून गेल्यावरही लोणार परिसरात कुठलही विकासाच काम सुरु झालं नाही.   या वर्षीही चार महिन्याआधी राज्यपालांनी सुद्धा लोणार सरोवराचा दौरा करुन अनेक मान्यता दिल्या पण कुठल्याही विकासाला चालना मिळाली नाही.  अखेर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने 370 कोटीचा निधी जाहीर केला आहे.  निधी   मिळाल्याने आता तरी लोणारचा विकास होईल का? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

लोणार सरोवराच्या भवताली आहे मोठं जंगल संपदा

लोणार सरोवर हे जागतिक किर्तीचं पर्यटन केंद्र असल्याने जगभरातून लोणार सरोवराला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. लोणार सरोवराभोवती मोठं जंगल आहे आणि या जंगलात रहिवाशांनी अतिक्रमण करुन अधिवास थाटला आहे आणि त्यामुळे या जंगलातील वन्यजीव हे धोक्यात आले आहेत. लोणारच्या भोवताली जंगलात विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ पक्षी, प्राणी आहेत आणि त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे.

उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती

लाखो वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सुमारे 20 लाख टन वजनाची उल्का जोरदार वेगाने पृथ्वीवर आदळली. त्यामुळे पृथ्वीवर 1.8 व्यासाचा आणि 200 मीटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. हे सुंदर आणि खाऱ्या पाण्याचं अनोखं सरोवर पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
Embed widget