रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काही जणांचा जीव मुंबईत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray : विरोध तुम्ही करु शकता मात्र आपल्या राज्याच्या संसकृतीला शोभणारा विरोध नव्हता, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला.
![रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काही जणांचा जीव मुंबईत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Maharashtra News CM Uddhav Thackeray Slams opposition bjp in vidhansabha रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काही जणांचा जीव मुंबईत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/25/8c04f6f5a3077607cb3fad3d319fc08b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार आज विधानसभेत घेतला.
कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार?
राज्यातील परिस्थिती न पाहता तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. राम आणि रावणच्या गोष्टीसारखी परिस्थिती आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता त्याचप्रमाणे अनेकांना केंद्रात सत्ता मिळाली पण जीव मात्र मुंबईत आहे. आठ भाषांत शिक्षण देणारी एकमेव मुंबई महापालिका आहे. कोविड संदर्भात अनेक ठिकाणी कौतुक करण्यात आले. कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक आहे
सरकारच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात शिवभोजन सुरू केलं. दहा रुपयात जेवण देतो हे मोठं काम आहे. आजपर्यंत 8 कोटीपेक्षा अधिका नागरिकांनी याचा लाभ घेतला, ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर 500 कोटी तरतूद केली आहे. त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल. काही झालं तरी भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे आरसा बघितला तरी भ्रष्टाचार करतात. पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपाल हे संविधानीक पद आहे. विरोधक तक्रार करण्यासाठी राज्यपालांकडे हक्काने जातात. एखाद्या तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)