Amravati News : अमरावती लोकसभा निवडणुकीच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी? आनंदराव अडसूळ आणि अजित पवार यांच्यात भेट
Amravati News : शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून या भेटीत दोघांमध्ये जवळजवळ 20 मिनिटांहून अधिक वेळ राजकीय चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज अमरावतीच्या (Amravati News) दौऱ्यावर आहेत. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा मुलाच्या विविहसोहळा आज अमरावती येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. दरम्यान, आज सकाळीच अजित पवार अमरावतीमध्ये दाखल झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात गेल्या 20 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली आहे. त्यांच्या या चर्चेमुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे . आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी या जागेवर आपला दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दोघांमध्ये 20 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा
आनंदराव अडसूळ हे सुद्धा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी अमरावतीवर दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार आणि आनंदराव अडसूळ भेटीत काही राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक संजय खोडके आणि काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार हे स्वतः वधू-वरांना घेऊन स्टेजवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी वधू वरांना आशीर्वाद दिला. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अजित पवार यांची भेट घेऊन दोघांमध्ये जवळ जवळ 20 मिनिटांहून अधिक वेळ राजकीय चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
मतदारसंघावरील आमचा दावा सोडणार नाही- आनंदराव अडसूळ
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरु असतांना महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेसाठी महायुती आणि इतर घटकपक्षांमध्ये रस्सीखेच होतांना दिसत आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा निवडणुक लढवण्याबाबत वेळोवेळी आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. सोबतच त्या भाजपमध्ये देखील प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आमरवतीच्या जागेवर आपला दावा केला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ ही भाजपची जागा नव्हती. ही जागा शिवसेनेची आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या तरी त्यांना येथून उमेदवारी मिळणार का, हे पाहावे लागेल. पण आम्ही या मतदारसंघावरील आमचा दावा सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघातून लढू. असा पवित्रा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी घेतला आहे. दरम्यान, आज आनंदराव अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या जागे बाबत चर्चा केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या