राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका
Congress Agitation : मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Congress Agitation : राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ मुंबईत आज काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत राजभवनावर धडक दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यातील काँग्रेस प्रमुख नेते, मंत्री, आमदार यांनी मोर्चाला उपस्थिती लावली. काँग्रेस मोर्चा रोखण्यासाठी राजभवन परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. काँग्रेस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाला छावणीचे स्वरुप आलं होते. दरम्यान आंदोलनदरम्यान पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अशोक चव्हाण, अतुल लोंढे, अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले.
मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा काढण्यात आला. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते देखील मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन राजकीय संघर्ष
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास तीस तास चौकशी करण्यात आली. यावरुन राजकीय वातावरण तापलंय. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी देशव्यापी आंदोलन केले. राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते रसत्यावर उतरले. यावेळी आंदोलनकर्त्या काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. काँग्रेस मुख्यालयाचा दरवाजा तोडून नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. दिल्ली पोलीस केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा काँग्रेसने केलाय. पक्ष कार्यालयात येण्यापासून रोखणारे दिल्ली पोलिस कोण? असा सवालही काँग्रेसने उपस्थित केलाय. या प्रकरणी काँग्रेस नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहे..
संबंधित बातम्या :
National Herald Case : राहुल गांधींच्या ED चौकशीवरून राजकीय संघर्ष, काँग्रेस नेते राष्ट्रपतीं-गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
