(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022 : 'माऊली, माऊली' च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
Sant Dnyaneshwar maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्याला वारकऱ्यांच्या गर्दीमुळे तब्बल अडीच तास उशीर झाला.
Dnyaneshwar maharaj Palkhi Prasthan 2022 : टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले.... 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते.
कोरोना नंतर तब्बल दोन वर्षानी आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा निघत असल्याने सर्वच सोहळ्याच्या पालखी प्रमुखांनी सांगितले प्रमाणे यंदा सुमारे 25 टक्के वारी अधिक भरेल असा अंदाज वर्तविला होता. यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आलेल्या वारकऱ्यांची संख्या पाहिली तर या प्रस्थान सोहळ्याला वारकऱ्यांच्या गर्दीमुळे तब्बल अडीच तास उशीर झाला. दरम्यान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.
रात्री साडे आठ वाजता आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले . त्यानंतर विणा मंडपातील माउलींची पालखी खांद्यावर घेवून माऊली माऊली नामाचा जयघोष करीत आळंदीकरांनी पालखी वीणा मंडपातून बाहेर काढण्यात आली . मंदिर प्रदक्षिणा करुन ती महाद्वारातून बाहेर पडत नगरप्रदक्षिणा करुन गांधी वाड्यात आणण्यात आली .सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात असणार असून उद्या बुधवारी हा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होइल. सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम आहे .
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फुगडीचा फेर धरला. विणा व टाळ वाजवत वारकऱ्यांसह त्यांनी भजनातही सहभाग घेतला.आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली होती.
महत्वाच्या बातम्या: