एक्स्प्लोर

Latur Crime News : आधी पाय तोडला, मग चेहऱ्यावरचे कातडे सोलून काढले; मोबाईल चोरीच्या संशयावरुन शाळकरी मुलाची हत्या

Latur Crime News : हत्या अंदाजे चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. 

Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा खु. शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून,  मोबाईल चोरीच्या संशयावरुन 15 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. हत्या इतका निर्घृणपणे करण्यात आली आहे की, क्रूरतेची सीमाच ओलांडली आहे. मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. संतोष गोविंद घुगे (वय 15, रा. कुमठा खु. ता. उदगीर) असे मयताचे नाव असून, ज्ञानोबा देवनाळे (वय 28 वर्ष, रा. पिंपरी ता. उदगीर) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील कुमठा खु. गावातील रस्त्याच्या अंदाजे दोनशे मीटरच्या आत असलेल्या एका शेतात एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत होता. त्यावेळी त्याला एक प्रेत आढळून आल्याने याची माहिती गावात देण्यात आली. गावकऱ्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस देखील काही वेळात घटनास्थळी पोहचले. मृताची ओळख व मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान पथक येण्यापूर्वीच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद यांनी तपासाचे चक्र फिरवत मारेकऱ्याचा शोध लावला. विशेष म्हणजे, मोबाईल चोरीच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

आरोपी शेतात सालगडी होता...

मयत संतोष गोविंद घुगे नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा खून करण ज्ञानोबा देवनाळे याने केला आहे. घटनास्थळी पासून जवळच असलेल्या एका शेतात तो सालगडी आहे. त्यास संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या अंदाजे चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. 

क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली

शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संतोष गोविंद घुगे या शाळकरी मुलाचे बेवारस प्रेत मृतावस्थेत आढळले. अंदाजे चार दिवसांपूर्वी त्याचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पोलिसांनी तपासाची चक्रे करून एका तासात मारेकऱ्याचा शोध लावला आहे. हा खून मोबाईल चोरीच्या संशयावरुन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले. हत्या करतांना क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली आहे. मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. यामुळे प्रेताची ओळख पटणे अवघड झाले होते. परंतु, पोलिसांनी काही तासातच आरोपींचा शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Latur Crime News : जुन्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या; परिसरात खळबळ; लातूर जिल्ह्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवालChitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघाAjit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Embed widget