Kolhapur News : सायरन वाजवत सुसाट चाललेल्या अॅम्बुलन्सची तीन वाहनांना धडक; अॅम्बुलन्सचा दरवाजा उघडताच 'अतरंगी' प्रकार समोर!
कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात या रुग्णवाहिकेनं एक चार चाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली. तीन वाहनांना धडक दिल्याने स्थानिक नागरिकांनी या रुग्णवाहिकेला थांबवले.
![Kolhapur News : सायरन वाजवत सुसाट चाललेल्या अॅम्बुलन्सची तीन वाहनांना धडक; अॅम्बुलन्सचा दरवाजा उघडताच 'अतरंगी' प्रकार समोर! Kolhapur News Ambulance hits 3 vehicles with siren sounding As soon as the door of the ambulance opens girl inside their Kolhapur News : सायरन वाजवत सुसाट चाललेल्या अॅम्बुलन्सची तीन वाहनांना धडक; अॅम्बुलन्सचा दरवाजा उघडताच 'अतरंगी' प्रकार समोर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/d570b3d0c323df581782b9fef98f91601697452522520736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : गरबा खेळण्यासाठी जाताना चक्क सरकारी दवाखान्याची रुग्णवाहिका वापरल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur News) उघडकीस आली. या रुग्णवाहिकेनं तीन वाहनांना धडक दिली. कोल्हापूर शहरातील (Kolhapur) हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात या रुग्णवाहिकेनं एक चार चाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली. तीन वाहनांना धडक दिल्याने स्थानिक नागरिकांनी या रुग्णवाहिकेला थांबवले. यानंतर रुग्णवाहिका चालकास दार उघडण्यास सांगितल्यानंतर सुरुवातीला त्याने नकार दिला. मात्र, दार उघडल्यानंतर त्या रुग्णवाहिकेमध्ये गरबा खेळायला जाणाऱ्या तरुणी असल्याचे उघडकीस आले. या सगळ्या तरुणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात आले.
रविरात्री रात्री घडला प्रकार
हा सर्व प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दहाच्या सुमारास हॉकी स्टेडियम समोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने एक रुग्णवाहिका (एमएच-09 एफएल-6709) सायरन वाजवत भरधाव निघाली होती. या रुग्णवाहिकेनं तीन वाहनांना ओव्हरटेक केल्यानंतर पुढे जाऊन चारचाकी गाडीला धडक दिली. काही नागरिकांनी पाठलाग सुरु केला. तेव्हा चालकाशेजारी दोन युवती बसल्याचे दिसून आले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी
नॉर्थस्टार हॉस्पिटलसमोर त्यांनी ही रुग्णवाहिका थांबवण्यात आली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यांनी रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडण्यास सांगितल्यानंतर चालकाने नकार दिला. मात्र, जमाव पाहून त्याने दरवाजा उघडला, तेव्हा गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी बसल्याचे लक्षात आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी असून, त्या गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी जाब विचारत जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क केला. गस्ती पथकाने तत्काळ तेथे येत चालकाच्या परवान्याचे छायाचित्र काढून पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकीद दिली आणि रुग्णवाहिका सोडून दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)