एक्स्प्लोर

Jalna Accident : जालना अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार होणार

Jalna Accident : ड्रायव्हरचे जीपवरचे नियंत्रण सुटल्याने ती जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली, त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सहा जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना : जालना अपघातातील (Jalna Accident) मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच या अपघातात जखमी असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. पंढरपूरवरून वारकरी आपल्या घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली होती. 

जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ प्रवासी काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने 7 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील भाविक  पंढरपूरच्या वारीवरुन आले होते. आपल्या गावाकडे जात असताना राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटल्याने ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.

जीपचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली. यावेळी जालनावरून राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये समोरून दुचाकीस्वार आल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही जीप थेट विहिरीत कोसळली. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं. मात्र या घटनेत इतर 7 जणांचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत चालक बचावला असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. याशिवाय मयताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देखील सरकारने जाहीर केली. याशिवाय जखमींवरती मोफत उपचार देखील केले जाणार आहेत.

जालना -मयत व्यक्तींची नावे 

1 प्रल्हाद बिटले- रा चनेगाव ता. बदनापूर.
2 प्रल्हाद महाजन -रा चनेगाव 
3 नारायण निहाळ -रा चनेगाव 
4 नंदा तायडे -रा चनेगाव 
5 रंजना कांबळे -रा खामखेडा ता भोकरदन .
6 ताराबाई भगवान मालुसरे -रा तपोवन ता भोकरदन .
7 चंद्रकला अंबादास घुगे --रा चनेगाव ता बदनापूर.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget