Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारी महिला सापडली, तपासात मोठा खुलासा!
Yogi Adityanath Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारी महिला ठाण्यातील रहिवासी आहे. एटीएसच्या तपासात याबाबत मोठे खुलासे झाले आहेत.
Yogi Adityanath Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला याबाबत एक मेसेज आला होता. ज्यामध्ये 'योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा बाबा सिद्दीकींसारखी परिस्थिती त्यांना भोगावी लागेल', असे लिहण्यात आलं होतं. या धमकीच्या संदेशानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आणि एटीएसला माहिती देण्यात आली होती. आता एटीएसने तपासात मोठा खुलासा केला आहे.
योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी महिला ही उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी असून तिचे नाव फातिमा असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फातिमा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती आहे.
एटीएसचे पथक महिलेच्या घरी दाखल
ही बाब निदर्शनास येताच एटीएसने प्रथम महिलेचा नंबरवरून तिचा शोध घेतला आणि तिचे लोकेशन शोधून काढलं. महिलेचे ठिकाण उल्हासनगरमध्ये आढळून आले. यानंतर एटीएसचे पथक महिलेच्या घरी पोहोचले आणि तिची चौकशी करण्यात आली. यानंतर आरोपी महिलेला पोलिस ठाण्यात आणून तेथे आणखी प्रश्न विचारण्यात आले. यानंतर आरोपी महिलेला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी तिला आणखी प्रश्न विचारण्यात आले. एटीएसने ही सर्व माहिती वरळी पोलिसांना दिली आहे.
आरोपी महिलेची मानसिक तपासणी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची ओळख पटली असून तिचे नाव फातिमा खान असल्याचे समोर आले आहे. वरळी पोलिसांनी महिलेला मुंबईत आणले. चौकशी केल्यानंतर तिला नोटीस देण्यात आली आहे. आता महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसिक तपासणीही केली जाणार आहे.
बाबा सिद्दीकीसारख्या परिस्थितीला सामोरे जाण्याची दिली धमकी
एका अनोळखी नंबरवरून मुंबई पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास त्यांची अवस्था बाबा सिद्दीकीसारखी केली जाईल, असे लिहण्यात आले होते. दसऱ्याच्या रात्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करून तीन हल्लेखोर पळून गेले. बाबा सिद्दीकी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती.