एक्स्प्लोर

Shreya Yadav : कलेक्टर व्हायला दिल्लीत गेली, पण कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने जीव गमावला; 25 वर्षांच्या श्रेया यादवची 'अधुरी कहाणी'

Shreya Yadav IAS Aspirant : आयएएस व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून श्रेया यादव ही 25 वर्षांची मुलगी एप्रिलमध्ये दिल्लीला गेली होती. त्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये श्रेयाचा मृत्यू झाला.

मुंबई : दरवर्षी कितीतरी मुलं कलेक्टर, एसपी होण्याचं स्वप्न बाळगतात आणि दिल्ली गाठतात. आपला मुलगा किंवा मुलगी अधिकारी म्हणून गावात येईल आणि आपण तिचं यश मिरवू अशी अनेक पालकांची इच्छा असते. असंच कलेक्टर होण्याचं स्वप्न बाळगून दिल्ली गाठलेली श्रेया यादव (Shreya Yadav) ही 25 वर्षांची मुलगी आता परत तिच्या गावी जाऊ शकणार नाही, किंवा तिच्या आई-वडिलांनाही कधीच भेटू शकणार नाही. दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये (Old Rajendra Nagar) पूरस्थिती निर्माण झाल्यानं एका कोचिंग सेंटरच्या (Rau's IAS study circle tragedy) तळघरात पाणी शिरलं. त्यामध्ये श्रेया यादवचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

दिल्लीत शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर आलेल्या पूरस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे केंद्र असलेलं राजेंद्र नगर मात्र हादरलं. या ठिकाणच्या राऊज् स्टडी सेंटरमध्ये झालेल्या एका अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर जिल्ह्यातील श्रेया यादवचा समावेश आहे.

श्रेयाच्या आई-वडिलांचं स्वप्न अधुरं

आपल्या मुलीने आयएएस अधिकारी व्हावं हे श्रेयाच्या आई-वडिलांचं स्वप्न. म्हणून त्यांनी तिला दिल्लीला पाठवलं. पण दिल्लीत अचानक पुराची स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये श्रेयाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसोबत तिच्या आई-वडिलांची इच्छाही पुराच्या पाण्यात वाहून गेली. श्रेयाच्या कुटुंबीयांसाठीही हा अत्यंत दुःखद क्षण आहे. 

या वर्षी एप्रिलमध्येच श्रेया आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती. मात्र शनिवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीतील राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरमध्ये पाणी साचल्याने तिचा अपघाती मृत्यू झाला. दोन भाऊ आणि बहिणींमध्ये ती सर्वात मोठी होती.

श्रेयाने प्राथमिक शिक्षण उत्तर प्रदेशातील अकबरपूरमधून केले. यानंतर त्यांनी सुलतानपूर येथून ग्रॅज्युएशन केले. तिथूनच तिने एमएससी केले आणि त्यानंतर ती आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. श्रेयाचे वडील राजेंद्र यादव यांचे बासखरी मार्केटमध्ये दूध डेअरीचे दुकान आहे तर आई गृहिणी आहे. तिचे दोन भाऊ तिच्यापेक्षा लहान असून शिक्षण घेत आहेत. 

जुन्या राजेंद्र नगरमध्ये ही घटना घडली

दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. दिल्लीत जुनं राजेंद्रनगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचलं. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे यूपीएससीची शिकवणी देणारे शेकडो वर्ग आहेत. यापैकीच राऊज् स्टडी सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे 30 विद्यार्थी अडकले होते. जेव्हा तळघरात पाणी भरू लागले तेव्हा तेथे 30 विद्यार्थी उपस्थित होते. अचानक तळघरात पाणी भरू लागल्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करावा लागला. मात्र तळघरात तीन विद्यार्थिनी अडकून राहिल्या आणि दुर्दैवाने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

या अपघातात श्रेयाशिवाय 28 वर्षीय नेविन डेल्विन आणि 25 वर्षीय तानिया यांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून स्टडी सेंटरच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget