Russia Ukraine News : युक्रेन-रशिया युद्ध, भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक
Russia Ukraine News : रशियाचे 100 पेक्षा जास्त सैन्य मारल्याचा दावा, युक्रेनने केला आहे. सात रशियन विमाने, चार हेलिकॉप्टर्स आणि लष्करी वाहने उद्धवस्त केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे.
Russia Ukraine News : मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी रशिया युक्रेनवर हल्ला करु शकतो, असा अंदाज वर्तवला होता. शेवटी, ज्याची भीती होती, तेच झाले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. रशिनायाने आज युक्रेनवर हल्ला केला. रशियाला हल्ल्याला युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. रशियाचे 100 पेक्षा जास्त सैन्य मारल्याचा दावा, युक्रेनने केला आहे. सात रशियन विमाने, चार हेलिकॉप्टर्स आणि लष्करी वाहने उद्धवस्त केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. युक्रेनचे 70 लष्करी तळ बेचिराख केल्याचा दावा रशियाने केला आहे. दोन्ही देशात सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार पेक्षा जास्त भारतीय अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्थरिय बैठक बोलवली आहे. या बैठकीला विदेशमंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि एवएसए अजित डोभाल उपस्थित असणार आहेत. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या फोनवर चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेरेंद्र मोदी पुतीन यांच्याशी काय चर्चा करणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Prime Minister Narendra Modi likely to speak to Russian President Vladimir Putin tonight: Sources #RussiaUkraineConflict pic.twitter.com/825LKD0WMC
— ANI (@ANI) February 24, 2022
गुरुवारी दुपारी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'केंद्र सरकारने आधीच अॅडव्हायजरी जारी केली आहे. केंद्र सरकारने तिथे विमाने पाठवली आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे विमान तिथे उतरू शकत नाही. सरकार शक्य तितके सातत्याने प्रयत्न करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, परिस्थिती विचित्र आहे, यात शंका नाही. भारताला शांतता हवी आहे, ती चर्चेने सोडवली पाहिजे. यासोबतच युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असेही ते म्हणाले.
#WATCH Prime Minister Narendra Modi chairs meeting of the Cabinet Committee on Security (CCS) pic.twitter.com/9lvHMRi1bT
— ANI (@ANI) February 24, 2022
भारताचे परराष्ट्र मंत्रालय युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलत आहे. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद असल्याने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्र सरकार सर्व भारतीयांच्या सुरक्षेची खात्री करेल, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले.
यूक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काळजी करु नका, जिथे आहात सुरक्षात आहात, असे दूतावासाने सांगितले. हवाई सीमा बंद असल्यामुळे भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या इतर मार्गाची चाचपणी केली जात आहे, असेही दूतावासाकडून सांगण्यात आले.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War: पाकिस्तानची नाचक्की! युद्धाच्या पाठिंब्यासाठी इम्रान खान रशियात..., रशियन अधिकारी म्हणाले 'उद्या भेटू या'
- Russia Ukraine War : भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना जारी
- Share Market: शेअर बाजारात त्सुनामी... दलाल स्ट्रीटवर हाहाकार; Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला