Russia Ukraine War: पाकिस्तानची नाचक्की! युद्धाच्या पाठिंब्यासाठी इम्रान खान रशियात..., रशियन अधिकारी म्हणाले 'उद्या भेटू या'
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाच्या भेटीला गेले आहेत.
मॉस्को: रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका, युरोपसह जगभरातील काही देश एकवटल्याचं दिसून येतंय. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची मात्र नाचक्की झाल्याची घटना घडलीय. या युद्धाच्या धामधुमीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाच्या भेटीला गेले आहेत. पण त्यांने स्वागत करायला कोणताही मोठा अधिकारी उपस्थित राहिला नाही. जो अधिकारी उपस्थित होता, त्याने इम्रान खान यांचे स्वागत तर केले पण आपण आता उद्या भेटू या असं सांगत त्यांचा लगेच निरोप घेतला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला भेट दिल्यानंतर मॉस्को भेटीसाठी आपण खूप उत्साही असल्याचं सांगितलं. आपण रशियाला भेट दिलेली वेळ ही एकदम परफेक्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मॉस्को विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं स्वागत तर झालं पण रशियन अधिकाऱ्याने लागोलाग त्यांना कारमध्ये बसवलं आणि 'आपण उद्या भेटू' असा संदेश दिला.
“What a time I have come, so much excitement", PM Imran Khan says after landing in Moscow, Russia #UkraineRussiaCrisis #Kiev #Putin #RussiaUkraine #Pakistan pic.twitter.com/RzKHEoTlij
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) February 24, 2022
अमेरिकेने इम्रान खान यांच्या रशिया भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, जगातल्या प्रत्येक जबाबदार देशाने रशियाच्या आक्रमणाविरोधात आवाज उठवावा, ही त्यांची जबाबदारी आहे.
युक्रेनचे भारताला मदतीसाठी आवाहन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटलं आहे. भारताने या प्रश्नावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ संवाद साधायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितलं आहे की, रशियाने युक्रेनची राजधानी कीवजवळ हल्ले केले आहेत. त्यामुळे आम्ही भारताला मदतीचे आवाहन करतो. जगभरातील हा तणाव कमी करण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना जारी
- Share Market: शेअर बाजारात त्सुनामी... दलाल स्ट्रीटवर हाहाकार; Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला
- Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला: शेअर बाजारात गुंतवणूकदार होरपळले; 10 लाख कोटींचा फटका