एक्स्प्लोर
अजमेरमध्ये परदेशी पर्यटकांना मारहाण आणि गैरवर्तन

जयपूर : राजस्थानच्या अजमेरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 4 परदेशी नागरिकांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. अजमेरमध्ये आलेले हे परदेशी नागरिक अजयपाल धाम या परिसरात फिरायला गेले होते. यावेळी काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात दोन पुरुष प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी यावेळी महिलांसोबतही अश्लील वर्तन केल्याचं सांगण्यात येत आहे.
यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या एका पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन या नागरिकांची सुटका केली.
सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
