Railway Budget 2025 : 100 अमृत भारत, 50 नमो भारत आणि 200 वंदे भारत, भारतीय रेल्वेची गेम चेंजर योजना
Railway Budget 2025 : अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnav) यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली.

Railway Budget 2025 : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2025) 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. हा अर्थसंकल्पात अनेक नवनवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये 17,500 जनरल कोच, 100 अमृत भारत, 50 नमो भारत आणि 200 वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे.
येत्या 2 ते 3 वर्षांत गाड्या तयार होणार
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या येत्या 2 ते 3 वर्षांत तयार होतील. शहरांमधील कमी अंतराचा प्रवास सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय 4.6 लाख कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचे काम चार ते पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. यामध्ये नवीन रेल्वे लाईन बांधणे आणि स्थानकांचे रीमॉडेलिंग यांचा समावेश आहे. 17500 जनरल डब्यांपैकी 1400 मार्चपर्यंत तयार होतील. पुढील आर्थिक वर्षात 2 हजार डबे तयार केले जातील. याशिवाय एक हजार नवीन उड्डाणपूल बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मालवाहतूक करणारी रेल्वे बनवणार
1.6 अब्ज टन मालवाहतूक क्षमता गाठण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. यामुळे भारत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मालवाहतूक करणारी रेल्वे बनवणार आहे. सुरक्षेसाठीची गुंतवणूकही 1.08 लाख कोटी रुपयांवरून 1.14 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील वर्षी ते 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नवीन रेल्वे लाईन बांधणे आणि स्थानकांचे रीमॉडेलिंग यांचा समावेश आहे. 17,500 जनरल डब्यांपैकी 1,400 मार्चपर्यंत तयार होतील अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत 340 किमी पेक्षा जास्त लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 340 किलोमीटरहून अधिक लांबीच्या मार्गावर काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळं समुद्राखालील बोगद्यासारखे दुर्मिळ तंत्रज्ञान देशात येणार आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान रेल्वे देशात आणत आहे. नद्यांवर आणि स्थानकांवर पूल बांधले जात आहेत, सर्व कामे वेगाने सुरु असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
Viral: रेल्वेत मिळाली नाही सीट, प्रवाशाने केला 'असा' भन्नाट जुगाड! लोकांनी अक्षरश: ठोकला सलाम, व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

