Pooja Khedkar : पूजा खेडकरची न्यायालयात देखील खोटी साक्ष, यूपीएसीसीचे न्यायालयात गंभीर आरोप
Pooja Khedkar : पूजा खेडकरवर यूपीएससीच्या वकिलांनी न्यायालयात गंभीर आरोप केले आहेत.
Pooja Khedkar, दिल्ली : युपीएससीची बनवाबनवी केलेल्या पूजा खेडकरवर यांच्यावर न्यायालयात आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. न्यायालयात देखील पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचे आरोप केंद्रीय लोकसेवा आयोगाने केले आहेत. पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात खोटी माहिती दिली असल्याचा युक्तीवाद युपीएससीच्या वकिलांनी केला आहे.
पूजा खेडकर न्यायलयात देखील खोट बोलत असल्याचा आरोप
यूपीएससीच्या वकिलांनी पूजा खेडकरवर न्यायालायत गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकर न्यायलयात देखील खोट बोलत असल्याचा आरोप यूपीएससीच्या वकिलांनी केला आहे. पूजा खेडकरनं कोर्टासमोर खोटी माहिती दिली आहे, दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान युपीएससीच्या वकीलांनी आरोप केले आहेत.
तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे हायकोर्टाचे पूजा खेडकरला आदेश
युपीएससीनं 31 जुलै रोजी पत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. शिवाय भविष्यात कोणतीही परिक्षा देता येणार नसल्याचे ई मेल मधून कळवले होते. परंतु तो ई मेल मिळाला नसल्याचा दावा पूजा खेडकरनं कोर्टात केला होता. यावर येत्या तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश पूजा खेडकरला हायकोर्टानं दिले आहेत. पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार आहे. यूपीएससी तर्फे नरेश कौशिक यांनी युक्तीवाद केला. पूजा खेडकरनं खोटी साक्ष दिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पूजा खेडकरवर युपीएससी परिक्षा पास होण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.
पूजा खेडकर यांची सनदी सेवेतून बडतर्फ
खोटी कागदपत्र देत युपीएससीची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकरवर आज (दि. 7) कारवाई करण्यात आली आहे. तिला सनदी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात खटलाही सुरु करण्यात आलाय. दरम्यान युपीएससीने कारवाईचा बडगा उगारत तिच्यावर कारवाई केली आहे. मागील आठवड्यात लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी टेक्निकल अडचणी आल्या होत्या. आता मात्र तिला सेवेतून पडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
यूपीएससीला खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या पूजा खेडकर यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले. मात्र, त्यानंतरही यूपीएससीला खोटे कागदपत्र सादर करुन फसवाफसवीचा प्रकार सुरुच आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी आल्या आहेत. यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. यूपीएससीकडे देशभरातून विविध ठिकाणांहून 30 तक्रारी आल्याचे समजते. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीने पाठवल्या आहेत.