एक्स्प्लोर

Morning Headlines 7th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. कसोटी विश्वचषक जिंकाच! जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल आजपासून; टीम इंडिया अन् ऑस्ट्रेलिया भिडणार

WTC Final 2023, IND vs AUS: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे.  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. याअगोदर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून टीम इंडिया इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. वाचा सविस्तर 

2. मान्सूनचं आगमन आणखी लांबणीवर; अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

Weather Today Updates: राष्ट्रीय राजधानीसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये जूनच्या सुरुवातीपासूनच हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारपासून (8 जून) वातावरणातील उष्मा वाढणार आहे. तसेच, बुधवारी (7 जून) हवामान विभागानं अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर  

3. Rajasthan Politics : सचिन पायलट 11 जूनला काँग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा, मंत्री मुरारी लाल मीणा म्हणाले...

Rajasthan Politics : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद शमल्याचं वृत्त ताज असतानच सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या पुढील वाटचालीबाबत अटकळ बांधली जात आहे. सचिन पायलट काँग्रेसला (Congress) रामराम ठोकून आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करु शकतात, अशी चर्चा रंगू लागली होती. त्यावर पायलट यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. राजस्थान सरकारमधील कृषी राज्यमंत्री मुरारी लाल मीणा म्हणाले की, "सचिन पायलट यांचा काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सैनिक आहोत. दोन नेते (गहलोत आणि पायलट) पक्षाच्या हायकमांडला भेटले आहेत. आम्ही सगळे मिळून लढू." वाचा सविस्तर 

4. Wrestlers Protest: केंद्र सरकारकडून पुन्हा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रण, अनुराग ठाकूर म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार"

Anurag Thakur On Wrestlers Protest: केंद्र सरकारनं भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. क्रीडामंत्र्यांनी ट्वीट केलं की, "सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे." वाचा सविस्तर 

5. PM किसान सन्मान निधीच्या 6 हजारांऐवजी आता शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय

PM Kisan Nidhi 14th installment: वर्षभरापासून बरसत असलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच रखरखतं ऊन, यामुळे बळीराज्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशातच शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हलका व्हावा यासाठी राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) नवनव्या योजना आणत असतात. अशीच एक योजना म्हणजे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून दिले जातात. ही योजना संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र आता त्याच धर्तीवर आणखी एक योजना राज्य सरकारनं सुरू केली असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. वाचा सविस्तर 

6. 7th June In History: मुमताज महलचे निधन, सहा दिवसांच्या युद्धात इस्त्रायने अरब देशांना पाणी पाजलं; आज इतिहासात

7th June In History: इतिहासापेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही. इतिहासात केवळ घटनांचा समावेश नसतो, तर या घटनांमधून तुम्हाला खूप काही शिकता येते. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालशी 7 जूनचा खूप खोल संबंध आहे. वास्तविक शहाजहानची पत्नी मुमताज महल हिचे 7 जून रोजी निधन झाले. मुमताज महलने बुरहानपूरमध्ये 14 व्या मुलाला जन्म देताना अखेरचा श्वास घेतला. तिच्या स्मरणार्थ शहाजहानने यमुनेच्या काठावर आग्रा येथे प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहलची निर्मिती केली. मुमताज महलच्या नावावरून त्याला ताजमहाल असे नाव देण्यात आले. वाचा सविस्तर 

7. Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 07 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरापासून दूर काम करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांनी आज मित्रांपासून दूर राहणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय म्हणतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल; 1758 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 28 Feb 2025 | 4 PMABP Majha Marathi News Headlines  4PM TOP Headlines 4pm 28 February 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
Embed widget