एक्स्प्लोर

Rajasthan Politics : सचिन पायलट 11 जूनला काँग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा, मंत्री मुरारी लाल मीणा म्हणाले...

Rajasthan Politics : सचिन पायलट काँग्रेसला रामराम ठोकून आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करु शकतात, अशी चर्चा रंगू लागली होती. त्यावर पायलट यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चा फेटाळल्या आहेत.

Rajasthan Politics : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद शमल्याचं वृत्त ताज असतानच सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या पुढील वाटचालीबाबत अटकळ बांधली जात आहे. सचिन पायलट काँग्रेसला (Congress) रामराम ठोकून आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करु शकतात, अशी चर्चा रंगू लागली होती. त्यावर पायलट यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. राजस्थान सरकारमधील कृषी राज्यमंत्री मुरारी लाल मीणा म्हणाले की, "सचिन पायलट यांचा काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सैनिक आहोत. दोन नेते (गहलोत आणि पायलट) पक्षाच्या हायकमांडला भेटले आहेत. आम्ही सगळे मिळून लढू." 

नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांना पूर्णविराम

11 जून रोजी सचिन पायलट स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढतील, अशी चर्चा होती. मात्र याबाबत स्वतः पायलट किंवा त्याच्या समर्थकांनी दुजोरा दिलेला नव्हता. सचिन पायलट नवा पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न विचारला असता मुरारी लाल मीणा म्हणाले की, दरवर्षी 11 जून रोजी आम्ही सगळे राजेश पायलट यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. ते शेतकरी नेते होते. दरवर्षी शोकसभा आयोजित केली जाते. यंदाही ही शोकसभा असेल. पायलट स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या चर्चा निराधार आहेत.

सचिन पायलट यांच्या मागण्या काय आहेत?

सचिन पायलट यांनी अलीकडेच तीन मागण्या केल्या होत्या, ज्यात राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) बरखास्त करुन त्याचं पुनर्गठन करणे, सरकारी परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे बाधित झालेल्या तरुणांना भरपाई देणे आणि मागील वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करणे या तीन मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान नवीन पक्ष स्थापन करण्याच्या शक्यतेच्या वृत्ताबद्दल विचारलं असता, सचिन पायलट यांच्या जवळच्या सूत्राने सांगितलं की, "सचिन पायलट त्यांच्या मागण्यांवर ठाम असून ते काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत आहेत." त्यामुळे सचिन पायलट समर्थकांच्या नजरा आता आपल्या नेत्याच्या पुढच्या निर्णयावर खिळल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षांसोबत गहलोत आणि पायलट यांची बैठक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांची अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबत मॅरेथॉन बैठक घेतली होती. या बैठकीनंतर काँग्रेसने म्हटलं होतं की, दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे मान्य केलं आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही गहलोत आणि पायलट यांनी पक्षाच्या प्रस्तावाला सहमती दर्शवल्याचे सांगितलं होतं. 

हेही वाचा

Rajasthan Politics : अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समेट, खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर दोघांमधील वादावर पडदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget