मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रिपदाची शपथ
देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपचे कमळ खुलले असून गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू होती.

मुंबई : भाजप आमदार रेखा गुप्ता (Rekha gupta) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. दिल्लीच्या (Delhi) चौथ्या आणि भाजपकडून दिल्लीसाठी पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी संपन्न झाला. दिल्लीतील रामलिला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थिती होते. रेखा गुप्तासह उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल एलजी विनयकुमार यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. दिल्ली विधानसभेत 27 वर्षानंतर सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं आहे. यापूर्वी, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सुषमा स्वराज, शीला दीक्षित, आतिशी यांनी महिला म्हणून कार्यभार सांभाळला होता. आता, रेखा गुप्त यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून शालीमार विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या तीनवेळा आमदार राहिलेल्या बंदना कुमारी यांचा पराभव करत त्या दिल्लीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या आहेत.
देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपचे कमळ खुलले असून गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे, दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. नेहमीप्रमाणे भाजपने दिल्लीसाठी देखील धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांना भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर, आज सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. संघविचारक आणि प्रचारक राहिलेल्या रेखा गुप्ता यांनी शालेय जीवनापासून भाजपसोबत काम केले आहे, विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप व संघ परिवाराशी जोडल्या असून सध्या भाजपच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यामुळेच, भाजपने पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी सोपवली आहे.
मुख्यमंत्र्यांसह 6 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
रेखा गुप्ता यांच्यासह उपमुख्यमंत्री व 5 आमदारांनी दिल्लीच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंद्र सिंह इंद्राज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह या आमदारांनी दिल्लीच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात जाट, पंबजी आणि पूर्वांचल सुमदायाचा विचार करुन स्थान देण्यात आलं आहे. भाजपने जातीय समीकरण सांभाळले असून लवकरच मंत्र्यांचे खातेवाटप होईल.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता ह्या संघविचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप पक्षात कार्यरत आहेत. सन 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या असून 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष झाल्या. सन 2003-2004 ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या, 2004-2006 ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या. त्यानंतर, एप्रिल 2007 ला उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. तर, 2007-2009 महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्ष झाल्या. मार्च, 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली, सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.
2 वेळा विधानसभेला पराभूत
रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. मात्र, 2015 ला त्यांचा वंदना कुमारी यांनी 11 हजार मतांनी पराभव केला, तर 2020 ला त्यांचा 3 हजार 440 मतांनी पराभव झाला. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला आहे.
Rekha Gupta sworn in as Delhi Chief Minister; Becomes 4th Woman CM of national capital
— ANI Digital (@ani_digital) February 20, 2025
Read @ANI Story | https://t.co/a8poOSRSF1#RekhaGupta #DelhiCM #Ramlilamaidan #PMModi pic.twitter.com/PkjCvWkU6i
उपमुख्यमंत्रीपद परवेश वर्मा
दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदी परवेश वर्मा यांनी शपथ घेतली असून ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. परवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे भाजपने दिल्ली व हरयाणातील जाट समुदायाने दाखवलेल्या विश्वाला सार्थ ठरवत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले असून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा त्यांनी पराभव केला आहे. यापूर्वी ते लोकसभा खासदार बनूनही संसदेत पोहोचले होते.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

