एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Videos: संतोष देशमुखांचा व्हिवळतानाचा आवाज, छातीवर उडी मारल्यानंतर रक्ताची उलटी, त्या 15 व्हिडीओंमध्ये नेमकं काय?
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले होते. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करुन संतोष देशमुखांची हत्या केली होती.
Santosh Deshmukh videos
1/12

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाइलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत. हे 15 व्हिडिओ आता समोर आले आहेत.
2/12

हे व्हिडिओ पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडीओ आहे, तर शेवटचा व्हिडीओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे.
3/12

या मारहाणीवेळी प्रतीक घुलेनं पळत येऊन दोन्ही पायांनी संतोष देशमुखांच्या छातीवर उडी मारली. त्यावेळी संतोष देशमुख यांना रक्ताची उलटी झाली.
4/12

पहिला व्हिडीओ 9 डिसेंबर रोजी वेळ 15.46.06 (तीन वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली) महेश केदारचा मोबाइल मधील पहिला व्हिडिओ... VID20241209154453 हा तब्बल एक मिनिट दहा सेकंद.. 171MB चा Video आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायर सारख्या हत्याराने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली जात आहे.
5/12

दुसऱ्या व्हिडीओत संतोष देशमुखांना पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जाताना दिसत आहे.
6/12

तिसरा व्हिडीओ हा 35 सेकंदांचा आहे. यामध्ये संतोष देशमुखांना वायरसारख्या मूठ लावलेल्या हत्याराने मारहाण केली जात आहे. चौथ्या व्हिडिओत एका प्लॅस्टिकच्या लवचिक पाईपने संतोष देशमुखांना मारहाण केली जात आहे. याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे.
7/12

पाचव्या व्हीडिओत संतोष देशमुखांना कॉलरला धरुन बसवले जात आहे. सहाव्या व्हिडीओत संतोष देशमुखांच्या तोंडावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत.
8/12

सातव्या व्हिडीओत संतोष देशमुख यांना तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण केली जात असून त्यामध्ये एका व्यक्तीचा हात दिसत आहे. आठव्या व्हीडिओत संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारले जात आहे. नवव्या व्हीडिओत संतोष देशमुख यांना खाली पाडून सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असं बोलायला सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्या तोंडावर लघवी केली जात आहे.
9/12

दहाव्या व्हिडीओत संतोष देशमुख यांच्या अंगावरील सर्व कपडे काढल्याचे दिसत आहे. 11 व्या व्हीडिओत अंडरवेअरवर बसलेल्या संतोष देशमुखांचे शुटिंग दिसत आहे.
10/12

बाराव्या व्हीडिओत संतोष देशमुख यांचे केस ओढून त्यांना मारहाण केली जात आहे. तेराव्या व्हिडीओत संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ उताणे झोपवल्याचे दिसत आहे. त्यांना रक्ताचे डाग असलेली पँट घातली जात आहे.
11/12

चौदाव्या व्हीडिओत संतोष देशमुख यांना एक व्यक्ती शर्ट घालताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या अंगावरील रक्ताने माखलेली बनियन काढून बाजूला फेकून दिल्याचे दिसत आहे. तर पंधराव्या व्हीडिओत संतोष देशमुख यांचा व्हिवळतानाचा आवाज येत आहे.
12/12

तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत होते आणि व्हिडीओही काढत होते.
Published at : 28 Mar 2025 12:07 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
पुणे
महाराष्ट्र


















