एक्स्प्लोर

LPG Price Hike: होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका... LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला

LPG Price Hike: होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला असून एलपीजीच्या दरांत वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरबरोबरच व्यावसायिक सिलेंडरही महाग झाले आहेत.

LPG Price Hike: मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai News) एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. दरम्यान, होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.  

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. 

चार महानगरांतील घरगुती सिलेंडर्सचे दर काय? 

  • दिल्लीत एलपीजीच्या किमती 1053 रुपयांवरुन 1103 रुपयांवर पोहोचल्यात.
  • मुंबईत एलपीजीची किंमत 1052.50 रुपयांवरुन 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
  • कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरुन 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे.
  • चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरुन 118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.

देशातील मोठ्या शहरांत कमर्शियल सिलेंडर्सचे दर काय? 

देशातील महानगरं जुने दर सध्याचे दर 
दिल्ली 1769 रुपये 2119.5 रुपये
मुंबई 1721 रुपये 2071.5 रुपये
कोलकाता 1870 रुपये 2221.5  रुपये
चेन्नई  1917 रुपये 2268 रुपये

8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ 

8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. 

एलपीजीचे दर कसे ठरवले जातात? 

देशातील एलपीजी गॅसची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी प्राइसने ठरवली जाते. याला IPP असे म्हणतात. भारत बहुतांशी गॅसचा पुरवठा आयातीद्वारे पूर्ण केला जातो. त्यामुळे IPP देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीद्वारे निश्चित होतो. सौदी अरेबियाच्या 'अरमाको' कंपनीच्या एलपीजी गॅस किंमतीच्या आधारे भारतातील गॅस दर निश्चित होतात. एलपीजीच्या किंमतीमध्ये गॅसचा दर, कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च, विमा आदी घटकांचा समावेश आहे. 

याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरांवरही होतो. मात्र, त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरणदेखील गॅसच्या दरांवर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार केला जातो. डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या घसरणीमुळे भारताला अधिक किंमत मोजावी लागत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
Jaykumar Gore:  माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?Kolhapur Bank News : आठ वर्षांनंतरही आठ बँकांकडे 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा पडूनच, नोटा घेण्यास RBI चा नकारABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 31 March 2025Palghar Talking Crow : काका...बाबा... पालघरमधील बोलणारा कावळा पाहिलात का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
Jaykumar Gore:  माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
मूलांच्या मानसिक आरोग्याकरीता संगीत कसे उपयोगी पडते!
मूलांच्या मानसिक आरोग्याकरीता संगीत कसे उपयोगी पडते!
टिकटॉक स्टारवर अत्याचार करून पाचव्या मजल्यावरून फेकले तरी सुद्धा वाचली, पण घरच्या इज्जतीला डाग लागला म्हणत घटस्फोटीत बाप अन् सख्ख्या भावानं...
टिकटॉक स्टारवर अत्याचार करून पाचव्या मजल्यावरून फेकले तरी सुद्धा वाचली, पण घरच्या इज्जतीला डाग लागला म्हणत घटस्फोटीत बाप अन् सख्ख्या भावानं...
विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय
विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय
Embed widget