Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या चौकशीसाठी पोलिसांनी मागितली कोठडी; याचिकेवर आज सुनावणी
Lakhimpur Violence : आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि न्यायालयाने या अर्जावर सुनावणीसाठी 11 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती.
![Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या चौकशीसाठी पोलिसांनी मागितली कोठडी; याचिकेवर आज सुनावणी lakhimpur violence uttar pradesh police to seek custody of ashish mishra hearing on the petition today Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या चौकशीसाठी पोलिसांनी मागितली कोठडी; याचिकेवर आज सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/11/6172aecfd0624bda12c5e8a8c213bf51_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lakhimpur Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) च्या कोठडीची मागणी करणाऱ्या पोलिसांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) शनिवारी लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर शनिवारी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, अटकेनंतर पोलिसांनी सांगितलं होतं की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
आशिषच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज
आशिषच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि न्यायालयानं या अर्जावर सुनावणीसाठी 11 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती. यापूर्वी आशीष मिश्राची शनिवारी रात्री उशीरा तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) च्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आशिषला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात पाठवलं होतं.
दरम्यान, आशिष मिश्रा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास गुन्हे शाखा कार्यालयात हजर झाले होते. एसआयटीने आशिष मिश्रा यांना तीन डझनहून अधिक प्रश्न विचारले. यूपी पोलिस डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, आशिष मिश्रा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.
ठार झालेल्या चालकाचा फोटो हा महत्त्वाचा पुरावा
चौकशीदरम्यान ठार झालेल्या चालकाचा फोटो महत्त्वाचा पुरावा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या वेळी हरिओमने पिवळ्या रंगाचा धारीदार शर्ट घातला होता, तर आशिष मिश्रा यांच्या वतीने हरिओमला थार जीपचा चालक म्हणून सांगण्यात आले होते. वास्तविक, व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये थार जीपचा चालक पांढऱ्या शर्टमध्ये पहायला मिळत आहे.
आशिष मिश्रा उर्फ मोनू घटनेच्या दिवशी पांढऱ्या शर्टमध्ये होते. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने मोनूच्या थार जीपमध्ये उपस्थित असल्याचाही उल्लेख केला आहे. आरोपींनी सांगितले होते की, घटनेनंतर लवकरच मोनू राईस मिलमध्ये गेले होते. थार जीपमधून सापडलेल्या 315 बोअर मिस काडतुसांचा तपास सुरू आहे. आशिष मिश्रा यांचे 315 बोअरचे परवानाधारक शस्त्र काडतूस असल्याचा संशय आहे. एसआयटीने सरकारकडे फॉरेन्सिक टीमची मागणी केली आहे.
Maharashtra Bandh: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, कुणाकुणाचा पाठिंबा?
Maharashtra Bandh: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)