एक्स्प्लोर

Nirbhaya Squad : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक नेमकं काम कसं करतं? जाणून घ्या या पथकाची सविस्तर माहिती

Nirbhaya Squad : दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने 2013 साली निर्भया फंडची स्थापना केली होती. हा फंड राज्य सरकारांना महिलांच्या सुरक्षांविषयक उपाययोजनांसाठी दिला जातो.

Nirbhaya Squad : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात महिलांसंदर्भात एक मुद्दा ऐकू येतो तो म्हणजे निर्भया पथकाचा (Nirbhaya Squad). विरोधी पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीच्या काही महिला नेत्यांकडून निर्भया निधीचा वापर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकरता करण्यात येतोय असे आरोप झाले. निर्भया पथकासाठी नियोजित निधीतून खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचे आरोप शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत यांनीदेखील याच आरोपांना दुजोरा दिला. सहाजिकच सत्ताधाऱ्यांकडूनदेखील या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं गेलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील या निर्भया पथकाच्या गाड्या मविआ सरकारच्या काळात नेत्यांकरता वापरण्यात आल्याचे आरोप केले. पण, या राजकारणाच्या पलिकडे मुद्दा तसाच राहिला. महिला सुरक्षेचा. निर्भय पथकच मुळी महिला सुरक्षा यंत्रणेचा एक महत्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हे निर्भया पथक नेमकं काम काय करतं? कसं काम करतं..? निर्भया पथकाची निर्मिती केव्हा झाली आणि गरजेला या पथकाची मदत कशी घ्यायची? जाणून घ्या या संदर्भात सविस्तर माहिती. 

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया हत्याकांडानंतर देशपातळीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाच्या अनेक राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणं सुरु झालं होतं. महाराष्ट्रातसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने नेमन्यात आलेल्या महत्वाच्या पथकांपैकी एक म्हणजे निर्भया पथक. मागच्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निर्भया पथकाचं उद्घाटन करण्यात आलं. या निर्भया पथकाचं काम कसं असेल त्याची रचना कशी असेल या सगळ्या संदर्भातली माहिती मुंबईचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. 

थोडक्यात सांगायचं तर दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने 2013 साली निर्भया फंडची स्थापना केली होती. हा फंड राज्य सरकारांना महिलांच्या सुरक्षांविषयक उपाययोजनांसाठी दिला जातो. महाराष्ट्र सरकारने या फंडातून महिलांविषयक सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करणे अपेक्षित आहे. आणि त्यानुसारच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्भया पथकाची स्थापना झाली. 

निर्भया पथक काम कसं करतं?

हे पथक प्रो अ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारं आणि रिअ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचं काम करतं. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आला आहे. या पथकाच्यावतीने पहिल्यांदा महिलांची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणं शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, कॉलेजेस, बस स्थानक, बाजारपेठा, हॉस्टेल्स, सिनेमा हॉल, उद्याने या सगळ्यांचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुलं, तरुण, पुरुषांचा शोध घेतं.

निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला पोलीस अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष हवालदारही असतात. त्यांची नेमणूक तीन महिन्यांकरता केली जाते. निर्भया पथकाच्या टीमचं अस्तित्व नागरिकांकरता गोपनीय ठेवण्यासाठी ही टीम खासगी वेशात वावरते. आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो. टीमबरोबर स्पाय कॅमेरा, स्मार्ट फोनचा कॅमेरा किंवा छुपा कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालींचं चित्रीकरण केलं जातं आणि या चित्रीकरणाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिस स्टेशनला नेण्यात येतं.

या व्यतिरिक्त निर्भया पथक काय काम करतं?

महिला आणि तरुणींना त्यांच्या सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देणे आणि पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत किंवा त्याचे परिणाम, शिक्षा याचं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात निर्भया पथकामार्फत प्रबोधनात्मक शिबीरं आयोजित केली जात आहेत. यासाठी मार्गदर्शन शिबिरे, पोस्टर्स, वेब साईट, रेडियोवरील महिलांविषयक/ तरुणांचे कार्यक्रम, स्टीकर्स, शॉर्ट फिल्म्स, थिएटरमध्ये सिनेमा मध्यंतरावेळी जाहिरातीद्वारे प्रबोधन केलं जातं.

निर्भया पथकाची मदत कशी मिळणार?

निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिला 103, 100 किंवा 1091 या टोल फ्री क्रमाकांचा वापर करु शकतात. व्हॉट्स ॲप अथवा Pratisad App बरोबरच ई-मेल, फेसबुक या सोशल मीडियावरुनही पोलिसांशी संपर्क साधता येईल. तसेच पोस्टकार्ड आणि पत्राद्वारेही जवळच्या पोलीस स्थानकास कळवू शकतात

103 हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना internet डेटा सुविधांसह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिलांना तक्रारी देणं सोयीचं व्हावं यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जातोय. निर्भया पथकाचं फेसबुक पेज ओपन केलं असून, या पेजवरही महिला तक्रारी नोंदवू शकतात.

‘निर्भया तक्रार पेटी’ची संकल्पना

मुंबई पोलिसांनी शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि मुलींच्या वसतिगृहात किंवा खासगी कार्यालयात तक्रारीसाठी ‘निर्भया तक्रार पेटी’ ठेवली आहे. तसेच शहरातील सार्वजनिक उद्याने, तलाव, विरूंगळा केंद्र अशा ठिकाणीसुद्धा तक्रार पेटी आहे.

एकंदरीत काय तर पहिल्यांदा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत पण घडल्याच तर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी निर्भया पथकासारख्या यंत्रणेची मदत होऊ शकते. सुरक्षित रहा!

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या बातम्या : 

Mann Ki Baat: 2022 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी, राजेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमकTop 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 March 2025 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
Embed widget