NASANASA Artemis : चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? व्हिडिओ आला समोर
Earth Rise : चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? याच एक व्हिडिओ नुकताच समोल आलाय. ओरियन स्पेसक्राफ्टने हे फुटेज पाठवले आहे.
![NASANASA Artemis : चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? व्हिडिओ आला समोर Here NASA Artemis I Earth Rise NASANASA Artemis : चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? व्हिडिओ आला समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/9acf251ef68f751672dfb042dd074ce91669295224888328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NASA Artemis : चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? याच एक व्हिडिओ नुकताच समोल आलाय. ओरियन स्पेसक्राफ्टने हे फुटेज पाठवले आहे. नासाची आर्टेमिस 1 ही मोहीम यशस्वीरित्या पुढे जात आहे. 16 नोव्हेंबर रोजी ही मोहीम सुरू झाली असून आता या मोहिमेने आपली 'काकद' दाखवायला सुरुवात केली आहे. SLS रॉकेटवर चंद्राचा शोध घेण्यासाठी निघालेल्या ओरियन स्पेसक्राफ्टने एक नेत्रदीपक व्हिडीओ पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रावरून पृथ्वीवरील दृश्य कसे दिसते हे पाहता येते. ओरियन स्पेसक्राफ्टने चंद्राजवळ उड्डाण करताना पृथ्वीला त्याच्या उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यात कैद केले.
याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी हे यान चंद्राजवळ पोहोचले आणि त्याचे इंजिन सुरू केले. नासाने चंद्राजवळ उडणाऱ्या ओरियन अंतराळयानाचे इंजिन बर्नचे फुटेज दाखवले. तुम्ही पृथ्वीकडे पाहत आहात, तुम्ही घराकडे पाहत आहात, असे नासाच्या प्रवक्त्या सँड्रा जोन्स यांनी चंद्राजवळ ओरियन स्पेसक्राफ्टच्या फ्लायबायच्या थेट कव्हरेजवर सांगितले.
ओरियन स्पेसक्राफ्टने हे फुटेज पाठवले त्यावेळी ते पृथ्वीपासून 373,000 किलोमीटर अंतरावर दूर होते. परंतु, स्पेसक्राफ्टमध्ये बसवण्यात आलेल्या हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांमध्ये काही दृष्य कैद केली. त्यामुळे पहिल्यांदाच चंद्रावरून पृथ्वी अशा पद्धतीने दिसली आहे. ओरियन अंतराळ यानाने चंद्राच्या अगदी जवळून उड्डाण केल्याचं म्हटलं जातं. त्याने 81 मैल त्रिज्येसह चंद्राचा पृष्ठभाग ओलांडला. या यानात एकही अंतराळवीर नाही.
नासाने असा अंदाज वर्तवला आहे की, या दशकाच्या अखेरीस मानव चंद्रावर दीर्घकाळ राहण्यास सुरुवात करेल. हॉवर्ड हू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टेमिस मिशन आपल्याला कायमस्वरूपी व्यासपीठ आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करत आहे. आम्ही चंद्रावरील कायमस्वरूपी कार्यक्रमाच्या दिशेने काम करत आहोत. ओरियन अंतराळ यान माणसाला पुन्हा चंद्रावर घेऊन जाणार आहे., असे हू यांनी म्हटले आहे.
ओरियन अंतराळयानाला ऊर्जा देण्यासाठी त्यात 4 सौर पंख आणि 3 पॅनेल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे 25 दिवस चालणाऱ्या मिशनसाठी वीज पुरवठा केला जाणार आहे. तीन खोल्या असलेले घर देखील इतक्या सोलर पॅनल्सने सहज प्रकाशित होऊ शकते. नासाचे आर्टेमिस 1 स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेट हे चंद्र मोहिमेवर जाणारे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. हे शनि व्ही रॉकेटपेक्षा 15 टक्के वेगाने उडते. अमेरिकेने गेल्या शतकात चंद्रावर शनि व्ही रॉकेट पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या
कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)