Crazxy Film Trailer Out Now : तुंबाड फेम सोहम शाहच्या 'क्रेझी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, आता मुलीला वाचवण्यासाठी लावणार जीवाची बाजी!
तुंबाड चित्रपटात मुख्य भूमिका केलेले सोहम शाह यांचा नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून चित्रपटात काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Crazxy Trailer Release : तुंबाड या चित्रपटाचं गारुड अजूनही अनेक लोकांवर आहे. या चित्रपटाची कथा, केलेला अभिनय आणि सादरीकरण याची आजही चर्चा होते. हा चित्रपट नुकताच री-रिलीज झाला होता. यावेळीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. दरम्यान, तुंबाड चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाह या अभिनेत्याचा आणखी एक मोठा चित्रपट येतोय. या चित्रपटाचे नाव क्रेझी असे असून त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. हा चित्रपट पाहून सोहम शाह पुन्हा बॉक्स ऑफिसवर जादू करणार, असं बोललं जातंय.
तुंबाड ठरला हिट आता क्रेझी चित्रपटाची प्रतीक्षा
सोहम शाह यांनी क्रेझी या चित्रपटाला एका वेगळ्या विषयाला हात घातलाय. या चित्रपटात कॉमेडी, ड्रामा असं सगळंच पाहायला मिळणार आहे. हा ट्रेलर पाहून या चित्रपटात नेमके काय असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सोहम शाह यांचा तुंबाड चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्यामुळे आता क्रेझी या चित्रपटातही असेच काहीतरी वेगळे असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय आहे?
या चित्रपटातही सोहम शाह हेच मुख्य भूमिकेत दिसतील. या ट्रेलरमध्ये त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मुलीचे अपहरण झाल्याचे समजताच ते हैराण होऊ जातात. या चित्रपटात अपहरण झालेल्या मुलीचा जीव वाचावा म्हणून ते शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. मुलीला वाचवण्यासाठी त्यांच्यापुढे अनेक संकटं उभी ठाकल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय. या ट्रेलरमध्ये सोहम शाह हे शल्यचिकित्सक असल्याचंही दाखवण्यात आलंय. चित्रपटात त्यांचे त्यांच्या मुलीवर सुरुवातीला विशेष प्रेम नसल्याचे ट्रेलर पाहून समजतंय. मात्र मुलीचे अपहरण झाल्यानंतर मुलीला वाचवण्यासाठी ते जमेल तो प्रयत्न करताना दिसतातय.
अपहरणकर्त्यांनी या चित्रपटातील मुख्य नायकाला 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. त्यामुळे चित्रपटातील नायक पाच कोटी रुपये कसे उभे करतो. तसेच मुलीला वाचवण्यासाठी नेमका काय प्रयत्न करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
क्रेझी हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा गिरीश कोहली यांनी लिहिलेली आहे. तर सोहम शाह यांच्यासोबत मुकेश शाह अमिता शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती चोरी
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चोरी झाली होती. शूटिंगमध्ये वापरण्यासाठी सेटवर बनावट नोटा आणण्यात आल्या होत्या. या नोटा नंतर चोरी झाल्या होत्या. त्यानंतर या नोटा पुन्हा एकदा सेटवर कोणीतरी आणून ठेवल्या होत्या. दरम्यान, आता या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
बापापेक्षा लेक भारी! ऋतिक रोशनच्या 17 वर्षीय देखण्या मुलाची चर्चा, पार्टीतील फोटो तुफान व्हायरल!
कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या, न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
