Egg Price: ऐकावं ते नवलच! एका अंड्याची किंमत 72 रुपये, दरात एवढी वाढ होण्याचं कारण काय?
Egg Price : एका अंड्याची किंमत (Egg Price) 72 रुपये झाली असं म्हणलं तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अमेरिकेत (America) एका अंड्याची किंमत ही 72 रुपयांवर पोहोचली आहे.

Egg Price : एका अंड्याची किंमत (Egg Price) 72 रुपये झाली असं म्हणलं तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अमेरिकेत (America) एका अंड्याची किंमत ही 72 रुपयांवर पोहोचली आहे. आपल्या जाचक धोरणांमुळे संपूर्ण जगात तणाव वाढवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांना देशांतर्गत अंड्याच्या वाढत्या किंमतीचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत अंडी महाग होत आहेत. अमेरिकेला सध्या बर्ड फ्लूचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं इथं अंड्यांचे भाव हे गगनाला भिडले आहेत. आगामी काळात अंडी आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये एक डझन ग्रेड A अंड्याची सरासरी किंमत $4.95 डॉलर म्हणजे 429.91) रुपयांवर पोहोचली होती. ऑगस्ट 2023 मध्ये हीच एक डझन अंड्यांची किंमत 2.04 डॉलर म्हणजे 176.47 रुपये होती. यावरुनच आपल्याला किंमतीत किती वेगाने वाढ झाली आहे याचा अंदाज येतो.
867 रुपयांना मिळतात 1 डझन अंडी
एव्हीयन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूमुळं अंडी उत्पादनावर परिणाम झाला आहे. ज्यामुळं किंमतीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी 2024 पासून अंड्याच्या किमतीत 65 टक्क्यांची इतकी मोठी वाढ झाली आहे. काही भागात लाटेचा आकडा त्याहूनही जास्त आहे. येथे डझनभर अंड्यांची किंमत 10 डॉलरम्हणजे 867.42 रुपयांच्या पुढे आहे.
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळं कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळं कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळं अंडी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर (USDA) च्या अहवालानुसार, 2024 च्या शेवटच्या तिमाहीत 20 दशलक्षाहून अधिक अंडी देणाऱ्या कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. त्यामुळं अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून लोकांचा खर्चही वाढला आहे.
अंड्याच्या किंमतीत 2015 पासूनची सर्वोच्च वाढ
अमेरिकेत अंड्याच्या किंमतीतील सध्याची वाढ ही 2015 पासूनची सर्वोच्च वाढ आहे. तेव्हा देशात शेवटचा बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. अमेरिकेत अंड्यांचा खप जास्त आहे, त्यामुळे किंमती वाढल्याने लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. यू.एस. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या मते, अंड्याच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांचा एकूण अन्न खर्च वाढत आहे. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या किंमतीत झालेल्या एकूण वाढीपैकी दोन तृतीयांश अंड्यांचा वाटा होता. बहुतांश दुकानांमध्ये अंड्यांचे रॅक रिकामेच पडून असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पादनावर परिणाम होत असल्याने अंड्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याव्यतिरिक्त, वाढत्या किमतींमुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यामुळे दुकानदार पूर्वीपेक्षा कमी अंडी खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
