Vastu Shashtra: तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वावर आहे? 'हे' संकेत ओळखा, अनेकांना माहीत नाहीत, वास्तुशास्त्रात म्हटलंय..
Vastu Shashtra: नकारात्मक ऊर्जा हे कुटुंबातील सर्व समस्यांचे कारण आहे. ज्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्या घरात सर्व कामे अपूर्ण राहतात आणि आनंद मावळलेला दिसतो.

Vastu Shashtra: आपल्या आयुष्यात कळत-नकळत अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, कधी त्या गोष्टी सकारात्मक असतात, तर कधी नकारात्मक असतात. काही वेळेस सगळं काही सुरळीतरित्या सुरू असून सुद्धा अचानक नकारात्मक गोष्टी घडायला लागतात. मग आपल्या मनात अनेक विचार येतात, पण तुम्हाला माहितीय का? वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकारच्या ऊर्जेचा उल्लेख केला आहे, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक उर्जेमुळे घरात सुख-समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्य शांततेने एकत्र राहतात. घरात एखाद्या नकारात्मक ऊर्जने प्रवेश केला किंवा एखाद्याची वाईट नजर कुटुंबावर पडली, की जीवन नरक बनते. वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते. पण याआधी तुमच्या घरातही नकारात्मक ऊर्जा आहे का, हे ओळखावे लागेल. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, त्या घरामध्ये काही संकेत आढळतात. जर तुमच्या घरीही अशी लक्षणे दिसली तर लगेच ती दूर करण्यासाठी काही उपाय करा.
वास्तुशास्त्र काय आहे?
वास्तुशास्त्र हे आपल्या भारतीय संस्कृतीत शतकानुशतके मानले जाणारे शास्त्र आहे. निसर्ग आणि उर्जा लक्षात घेऊन वास्तूचे नियम बनवले आहेत. बहुतेक हिंदू घरांमध्ये हे शास्त्र पाळले जाते. असे मानले जाते की वास्तूचे नियम नियमितपणे पाळल्यास अनेक चमत्कारी फायदे मिळतात आणि लोक त्यांच्या जीवनात नेहमी सुखी आणि समृद्ध राहतात. याशिवाय वास्तूचा आर्थिक लाभाशीही संबंध आहे. अनेक वेळा लोक वास्तूचे नियम पाळत नाहीत तेव्हा त्यांना वास्तू दोषांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
नकारात्मक ऊर्जा कशी ओळखाल?
वास्तुशास्त्रानुसार, घर ही अशी जागा आहे जिथे थकलेल्या माणसालाही शांत आणि आरामदायी वाटते. मन विचलित होत नाही आणि आनंदी वातावरण असते. पण जर तुम्ही घरी येताच तुम्हाला उदास वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून पुन्हा पुन्हा वाद होत असतील, तर समजून घ्या की तुमचे घर नकारात्मक उर्जेच्या प्रभावाखाली आहे.
'हे' संकेत ओळखा..
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही बाहेर ठीक आहात, पण घरी आल्यावर तुम्हाला तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो किंवा दु:खी वाटतं, हे देखील नकारात्मक उर्जेचे लक्षण आहेत. तुम्हालाही असे वाटत असेल तर घरी मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या, बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि वास्तु नियमांनुसार घर सजवा आणि सांभाळा.
एखाद्याची उपस्थिती जाणवणे
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला वाटत असेल की घरी कोणीतरी उपस्थित आहे किंवा तुम्हाला घरात कोणीतरी अज्ञाताचा वावर असल्याची भीती वाटत असेल, शरीरात थरकाप जाणवत असेल इत्यादी, हे देखील नकारात्मक उर्जेचे लक्षण असू शकतात. खरं तर, नकारात्मक उर्जेमुळे, व्यक्ती थकल्यासारखे किंवा गोंधळल्यासारखे वाटते.
नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय?
वास्तु तज्ज्ञांच्या मते नकारात्मक ऊर्जेचा भूतांशी संबंध नाही. जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचे संकेत दिसले, तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरात भूत किंवा आत्मा आहे. घराची चुकीची रचना, वस्तू चुकीच्या दिशेला ठेवणे इत्यादींमुळे सुद्धा वास्तू दोष उद्भवतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा ओळखून काढून टाकली तर तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
हेही वाचा>>>
Vastu Shashtra: धन-संपत्तीत होईल वाढ, तिजोरी भरेल पैशाने! कुबेर देवाची 'ही' दिशा अनेकांना माहीत नाही, वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















