एक्स्प्लोर
कधी आईचा गॉगल, कधी मोकळे केस, लहानपणीची फॅशनेबल प्रियांका चोप्रा पाहिलीत का? देसी गर्लचे एक्स्क्लुझीव्ह फोटो समोर!
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा फारच लहान दिसत आहे.
priyanka chopra
1/9

Priyanka Chopra Old Photos: बॉलिवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत असते. तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय? याची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगते. दरम्यान, प्रियांका चोप्राने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो तिच्या बालपणीचे आहे. आतापर्यंत हे फोटो तिने कुठेही शेअर केलेले नाहीत. त्यामुळेच अतिशय सुंदर असणारी प्रियांका चोप्रा लहाणपणी कशी दिसायची, हे या फोटोंच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाले आहे.
2/9

प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिग्गज दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेता अजय देवगण दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा जिन्स आणि शर्ट परिधान केलेली दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या गळ्यात मोठा सापही दिसतोय.
3/9

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या मित्रासोबत दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत ती स्लीव्हलेस वन वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने केस बांधलेले दिसत आहेत.
4/9

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा मोकळ्या केसांत हसताना दिसतेय. विशेष म्हणजे सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या काळातील तिचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा फारच लहान दिसत आहे. तिचा हा फोटो 1999 सालातील आहे.
5/9

या फोटोंमध्ये प्रियांकाचे वय अवघे 13 वर्षे असून तो फोटो 1995 सालचा आहे. या फोटोमध्ये तिच्या पुढे एक ग्लास दिसतोय. या ग्लासमधून मी कोला पित होते, असे प्रियांकाने सांगितले आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. बोस्टनमधील हा फटो असून हा फोटो 1997 सालातील आहे.
6/9

या फोटोंमध्ये प्रियांकाचे वय अवघे 13 वर्षे असून तो फोटो 1995 सालचा आहे. या फोटोमध्ये तिच्या पुढे एक ग्लास दिसतोय. या ग्लासमधून मी कोला पित होते, असे प्रियांकाने सांगितले आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. बोस्टनमधील हा फटो असून हा फोटो 1997 सालातील आहे.
7/9

प्रियांकाने तिच्या कुटुंबाचाही फोटो शेअर केला आहे. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय 1994 साली लेहमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळचे हे फोटो आहेत, असे प्रियांकाने सांगितले. तर दुसरा फोटो हा 1993 सालातील आहे.
8/9

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या आई-वडिलांसोबत दिसतेय. हे फोटो 1987 सालातील आहे. या काळात तिला अस्थमाचा त्रास होता, असे प्रियांका चोप्राने सांगितले आहे.
9/9

प्रियांकाने शेअर केलेले हे सर्वांत जुने फोटो आहेत. यातील पहिला फोटो हा 1983 तर दुसरा फोटो 1982 सालातील आहे. पहिल्या फोटोत ती तिच्या वडिलांच्या बाईकवर बसलेली आहे. तर तिच्या डोळ्यावर तिच्या आईचा चष्मा आहे.
Published at : 17 Feb 2025 09:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
चंद्रपूर
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















