Earthquakes : दिल्लीसह काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके, 5.08 रिश्टर स्केलने काश्मीर हादरलं
Earthquakes : राजधानी दिल्लीसह काश्मीर,पंजाब, हरियाणा मध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहे. या भूकंपाच्या झटक्यांची तीव्रता 5.08 स्केल इतकी होती.

Earthquakes : जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मंगळवारी (13 जून) रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाच्या(Earthquake) झटक्यांची नोंद झाली आहे. भूकंपाच्या या झटक्यांची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती. जम्मू काश्मीरमधील डोडा, जम्मू, उधमपूर, पुंछ आणि श्रीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. तसेच या भूकंपाचे केंद्र हे डोडा जिल्ह्यामध्ये होते.
राजधानी दिल्लीतही भूकंपाचे झटके
जम्मू आणि काश्मीरसह राजधानी दिल्लीतही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. दिल्लीतही 5.4 रिश्टर स्केलने हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दरम्यान दिल्लीसह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये देखील भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. यावर नागरिकांनी प्रतिक्रिया देत यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं. तसेच यामुळे कार्यालयं तात्काळ रिकामी देखील करण्यात आली. या भूकंपामुळे शाळेतील विद्यार्थी, दुकानदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया काश्मीरमधील नागरिकांनी दिली.
जम्मू-कश्मीर में किश्तवाड़ से 30 किमी दक्षिण पूर्व में रिक्टर पैमाने पर 5.7 तीव्रता का भूकंप आया: EMSC
— ANI_HindiNews (@AHindinews) June 13, 2023
(वीडियों पूंछ का है) pic.twitter.com/smUr41Sput
#WATCH | An earthquake of magnitude 5.4 on the Richter scale hit Doda, J&K at 1:33 pm this afternoon.
— ANI (@ANI) June 13, 2023
A local from Srinagar says, "The earthquake scared school children. People in shops rushed out. It was scary. This was more intense than the tremors last week..." pic.twitter.com/c08L07mz6i
तीव्रतेनुसार भूकंपाचे असे केले जाते वर्गीकरण
रिश्टर स्केल या प्रमाणानुसार भूकंपाची तीव्रता मोजली जाते. जर भूकंपाचे रिश्टर स्केल 2.0 पेक्षा कमी असेल तर त्या भूकंपाचे वर्गीकरण सूक्ष्म भूकंपामध्ये केले जाते. यानुसार जगभरात दररोज 8,000 भूकंप नोंदवले जातात असं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 2.0 ते 2.9 तीव्रतेच्या भूकंपाचे किरकोळ श्रेणीत वर्गीकरण केले जाते. हे धक्के सर्वसाधारणपणे आपल्याला जाणवत देखील नाहीत. तर 3.0 ते 3.9 रिश्टर स्केलचे झटके हे अत्यंत हलके भूकंपाचे झटके मानले जातात हे भूकंपाचे झटके जाणवतात परंतु त्यामुळे फार कमी प्रमाणात नुकसान होते. हलक्या श्रेणीतील भूकंप 4.0 ते 4.9 तीव्रतेचे असतात. या भूकंपाचे धक्के जाणवतात आणि त्यांच्यामुळे घरातील वस्तू हलताना दिसतात. या श्रेणीतील भूकंपामुळे बरेच नुकसान देखील होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
