Video : अभ्यास का केला नाही? पाच वर्षाच्या चिमुकलीला हातपाय बांधून कडक उन्हात गच्चीवर सोडले, पोलीस करणार आईवर कारवाई
Delhi Girl Child’s Scary Viral Video : चिमुकलीला गच्चीवर सोडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Delhi Girl Child’s Scary Viral Video : पालकांकडून मुलांना प्रेम देणं आणि त्यांची काळजी घेणे अपेक्षित असते. परंतु असे काही पालक आहेत जे मुलांना धडा शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांच्यावर क्रूर अत्याचार करायला मागेपुढे पाहत नाहीत. राजधानी दिल्लीतील खजुरी खास परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खजुरी खास परिसरात एका पाच वर्षाच्या मुलीला तिच्या आईने हात पाय बांधून कडक उन्हात टेरेसवर सोडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित पालकांवर कारवाई केली आहे.
सध्या दिल्लीत उन्हाचा चांगलाच तडाखा जाणतोय. परंतु, अशा कडक उन्हात हातपाय बांधून अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीला गच्चीवर सोडले सोडण्यात आले आहे. दिल्लीच्या खजुरी खासमध्ये एका कुटुंबाने आपल्याच मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार केलाय. या चिमुकलीचा दोष एवढाच की तिने गृहपाठ केला नाही. याचाच राग मनात ठेवून आईने या पाच वर्षीय मुलीचे हात पाय बांधून तिला भर उन्हात टेरेसवर सोडले. यावेळी मुलगी मोठ-मोठ्याने रडत- ओरडत होती. परंतु, त्या आईचे काळीज पाघळले नाही. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली.
दिल्ली का एक दिल दहला देने वाला वीडियो वायरल हो रहा है. होमवर्क न करने से नाराज़ एक माँ ने बच्ची के हाथ पैर बांध कर उसे धूप में छोड़ दिया है. दिल्ली पुलिस ने इस परिवार को ट्रेस कर लिया है और कार्रवाई की तैयारी कर रही है. https://t.co/G97OftTT5i #Delhi #DelhiPolice pic.twitter.com/KFgAgl29Xh
— Sansani (@sansaniABP) June 8, 2022
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दिल्लीत घडलेली ही घटना 2 जून रोजीची असून व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांशी संपर्क केला. मुलीच्या आईने सांगितले की, तिने गृहपाठ केला नाही. त्यामुळे तिला शिक्षा करण्यासाठी तिच्या आईने काही मिनिटे या मुलीला हात आणि पाय बांधून टेरेसवर सोडले, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या मुलीची प्रकृती व्यवस्थीत आहे. परंतु, पोलीस संबंधित कुटुंबावर तातडीने कारवाई करणार आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ आधी करवल नगरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पोलीस तपासात तो दिल्लीतील खजुरी खास येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
