Mohammad Zubair Bail : मोहम्मद जुबेर यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
Mohammad Zubair Bail : फॅक्ट चेकर आणि Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Mohammad Zubair Bail : फॅक्ट चेकर आणि Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जुबेर यांना सर्व FIR प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येत नाही, असे यावेळी कोर्टानं स्पष्ट केलेय. तसेच सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेल्या सर्व गुन्ह्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलकडे वर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत. दिल्लीमध्ये दाखल झालेला गुन्हा उत्तर प्रदेशमधील दाखल गुन्ह्याशी मिळता जुळता आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडे सर्व प्रकरणं सोपवावं.
जुबेर यांनी केलेल्या मागील ट्विट प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या प्रकरणातील अटकेला रोख लागवण्यात आली आहे. जुबेर यांना 20 रुपयांच्या जातमुचलक्यावर सुप्रीम कोर्टानं जुबेर यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली येथील पटियाला हाऊस कोर्टाममध्ये ही रक्कम भरायची आहे. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जुबेर यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोडण्यात येऊ शकते.
यापूर्वी जुबेरचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता, तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जुबेरने सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी अर्ज केला होता.
मोहम्मद जुबेर यांच्यावर काय आरोप?
फॅक्ट चेकर वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्यावर यती नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरूप यांना 'द्वेष पसरवणारे' म्हणून संबोधल्याचा आरोप आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला.
मोहम्मद ज़ुबैर को यूपी में दर्ज सभी FIR में सुप्रीम कोर्ट ने अंतरिम जमानत दी। कहा- अंतहीन समय तक हिरासत में नहीं रखा जा सकता।
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) July 20, 2022
सुप्रीम कोर्ट ने यूपी में दर्ज सभी FIR दिल्ली पुलिस की स्पेशल सेल के पास ट्रांसफर किए। कहा- दिल्ली में दर्ज केस यूपी में दर्ज मामलों से मिलता-जुलता है।
#BREAKING Supreme Court orders release of Mohmmed Zubair on interim bail in all UP Police FIRs.#MohammedZubair #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) July 20, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Mohammed Zubair Arrested: पत्रकार मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
- Mohammed Zubair : पत्रकार मोहम्मद जुबेरवरून जर्मनीने भारतावर साधला निशाणा, लोकशाही मुल्यांबाबत फटकारले
- Mohammed Zubair Arrested: पत्रकार मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप