Mohammed Zubair : पत्रकार मोहम्मद जुबेरवरून जर्मनीने भारतावर साधला निशाणा, लोकशाही मुल्यांबाबत फटकारले
Mohammed Zubair : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या Alt न्यूजचे सहसंस्थापक पत्रकार मोहम्मद जुबेरचे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
Mohammed Zubair : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या Alt न्यूजचे सहसंस्थापक पत्रकार मोहम्मद जुबेरचे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. पत्रकार झुबेरच्या अटकेवर जर्मनीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत स्वतःला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून सांगतो, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य यासारख्या लोकशाही मूल्यांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे.
"कोणत्याही बंधनाशिवाय आणि दबावाशिवाय पत्रकारिता व्हावी"
जर्मन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते क्रिश्चियन वॅगनर म्हणाले की, "आम्ही अनेकदा जगभरातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देतो आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहोत." हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते भारतालाही लागू होते. कोणत्याही बंधनाशिवाय आणि दबावाशिवाय पत्रकारिता होणे हे कोणत्याही समाजासाठी आवश्यक आहे, परंतु तसे न होणे ही चिंतेची बाब आहे.
MINI THREAD
— Richard Walker (@rbsw) July 6, 2022
German foreign ministry on India's ongoing detention of journalist Mohammed Zubair
"India describes itself as the world’s largest democracy. So one can expect democratic values like freedom of expression and of the press to be given the necessary space there"
/1 pic.twitter.com/g26gSSKEO7
भारताने अभिव्यक्ती-वृत्तपत्र स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांना महत्त्व देणे अपेक्षित
ते म्हणाले, पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेसाठी त्रास देऊ नये, त्यांना तुरुंगात टाकू नये. पत्रकार मोहम्मद जुबेर यांच्या प्रकरणाची आम्हाला माहिती आहे. नवी दिल्लीतील आमचे दूतावास या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही या विषयावर युरोपियन युनियन (EU) सोबत संपर्कात आहोत." युरोपियन युनियनने या प्रकरणी भारताशी चर्चा केली आहे. या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य हे चर्चेचा विषय राहिले. भारत स्वतःला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणवतो, त्यामुळे भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांना महत्त्व देणे अपेक्षित आहे. या प्रकरणी भारत सरकारवर टीका करण्यास जर्मनी का कचरत आहे, असे विचारले असता? यावर जर्मनीच्या प्रवक्त्याने उत्तर दिले की, मी असे म्हणणार नाही की कोणतीही टीका झाली नाही. मात्र आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तत्त्वे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्त्व याबद्दल बोललो आहोत.
German foreign ministry on detention of Mohammed Zubair /2
— Richard Walker (@rbsw) July 6, 2022
- Germany aware of this case
- Embassy "monitoring very closely"
- In contact with EU partners on the matter
- Importance of press freedom "also applies to India"
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक
Alt न्यूजचे सह-संस्थापक आणि तथ्य तपासणारे पत्रकार मोहम्मद जुबेरला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 2018 च्या ट्विटचा हवाला देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जही फेटाळला असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेण्याचे केले मान्य
फॅक्ट चेकिंग वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोहम्मद जुबेरने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यामध्ये जुबेरने आपल्याला इंटरनेटवर जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याला सरन्यायाधीशांनी मान्यता दिल्यास त्यावर सुनावणी होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका ट्विटवरून त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. 4 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये मोहम्मद जुबेरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोहम्मद जुबेरवर काय आरोप?
फॅक्ट चेकर वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्यावर यती नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरूप यांना 'द्वेष पसरवणारे' म्हणून संबोधल्याचा आरोप आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला.