Devendra Fadnavis : 'आम्ही संपलेलो नाही, आम्ही कधीच संपू शकत नाही'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'सनातन' शब्दाचा अर्थ
Devendra Fadnavis : सनातनचा अर्थ काय? तर आम्ही संपलेलो नाही, आम्ही कधीच संपू शकत नाही. असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नागपुरातील एका कार्यक्रमात केलं आहे.
Nagpur News : आमचा सनातन धर्म कसा आहे, तर तो पुण्यपुरातन ही आहे आणि नवीनही आहे. इंग्रजांनी आमच्या इतिहासातील एक मुख्य कालखंड डिलीट केला होता. आमचा एक मोठा कालखंड यात डिलीट करण्यात आला होता. त्या कालखंडाला आम्हाला पुन्हा प्राप्त करावे लागेल. किंबहुना, सनातन चा अर्थ काय? तर आम्ही संपलेलो नाही, आम्ही कधीच संपू शकत नाही. आम्हालाही अडचणी आल्या. आम्हीही काही चुकीच्या परंपरांचा स्वीकार केला. मात्र त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आम्ही स्वतः शोधलाय. चुकीच्या मूल्यांना बदलण्याचे साहसही आम्हीच केलंय. म्हणूनच आमच्या संस्कृतीला सनातन संस्कृती म्हटलं जातं. असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात 'बनाये जीवन प्राणवाण' या मुकुल कानिटकर लिखित पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन (लोकार्पण) आज होत आहे. यावेळी श्रुंगेरी महासंस्थान शारदा पीठाचे 72वे पीठाधीश अभिनव शंकर भारती महास्वामी हे ही उपस्थित आहे. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय.
इंग्रजांनी आमच्या इतिहासातील एका मुख्य कालखंड डिलीट केला
सनातन संस्कृतीमध्ये पावला पावलांमध्ये विज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच आमच्यात राहिला आहे. आपल्या संस्कृतीत, संस्कारांमध्ये विज्ञान आहे, त्याला नव्या स्वरूपात नव्या पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता. संपूर्ण युरोप जेव्हा सभ्यतेला ओळखत ही नव्हता. तेव्हा आपल्याकडे भारतीय सभ्यता पूर्णपणे विकसित झाली होती. इंग्रजांनी आमच्या इतिहासातील एका मुख्य कालखंड डिलीट केला होता. यावेळी आमचा एक मोठा कालखंड डिलीट करण्यात आला होता. त्या काळखंडला आम्हाला पुन्हा प्राप्त करावे लागेल असेही ते म्हणाले.
अर्धा लिटर पेट्रोल टाकून गेलो अन् अडीच लाखांचे काम घेऊन आलो
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि एका प्रकारे कौटुंबिक कार्यक्रम आहे. कारण ज्या आय व्यू इंटरप्राईजेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, ते आशुतोष श्रीवास्तव, मुकुल कानिटकर, संजय सिंग आणि मी अशा सर्व मित्रांनी ही ऍडवटाईजमेंट एजन्सीच्या स्वरूपात आम्ही चार मित्रांनी सुरू केली होती. तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा क्लासेस घेऊन ही ऍड एजन्सी चालवत होतो. माझ्या घरच्या गॅरेजमध्ये याची सुरुवात झाली होती.
आम्हाला आमचा पहिला ऍडव्हर्टाईसमेंटसाठी काम (कंत्राट) मिळण्याचा किस्साही रंजक आहे. तेव्हा आम्ही तुटक्या फुटक्या दुचाकी गाड्या घेऊन आमचे पहिले काम मिळवायला गेलो होतो. तेव्हा दुचाकीमध्ये एक लिटर पेट्रोल टाकायलाही पैसे नव्हते. तेव्हा आम्ही फक्त अर्धा लिटर पेट्रोल टाकून गेलो होतो आणि तिथे अडीच लाख रुपयांचे काम आम्हाला मिळाले होते. असा किस्साही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
हे ही वाचा