विधानसभेवेळी केलेला वादा आम्ही पूर्ण करणार; लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये, भाजपकडून महत्त्वाची माहिती
Chitra Wagh : लवकरच 2100 प्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येतील आणि आम्ही जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांशी वादा केला आहे तो आम्ही पूर्ण करू,.असे आश्वासन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलंय.
Gondia News : लाडकी बहिणी योजनेचे सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिले होते. परंतु अद्यापही 2100 रुपये प्रमाणे पैसे आले नाही. 1500 रुपये प्रमाणेच महिलांच्या खात्यावर पैसे लाडक्या बहिणी योजनेचे येत आहेत. यावर बोलताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र महिला अध्यक्षा आणि भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) म्हणाल्या की, लवकरच 2100 प्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येतील आणि आम्ही जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांशी वादा केला आहे तो आम्ही पूर्ण करू. असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश दिलंय. त्यामुळे लवकरच त्यांच्या खात्यावर 2100 रुपये प्रमाणे पैसे येतील, असे त्या यावेळी म्हणाल्या.
विरोधक हे महाराष्ट्र मध्ये भीतीचे वातावरण पसरवीत आहे : चित्रा वाघ
सैफ अली खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी सैफ अली खान याला सुरक्षा असूनही त्यांच्यावर हल्ला होतो. तर महाराष्ट्रातील जनता ही सुरक्षित आहे का? असा सवाल केला होता. त्यावर बोलताना भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, विरोधकाचं हे कामच आहे. परंतु याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर्याने या घटनेच्या संबंधाने मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना कशाप्रकारे झाली, का झाली याबाबत आता मुंबई पोलीस तपास करीत आहे आणि या बाबतीत मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यामुळे विरोधकांनी काय बोलावं हा त्यांच्या प्रश्न आहे. पोलिसांनी सर्व बाबी तपासून या घटनेमागे काय आहे, हे खरं कारण शोधूनच काढतील. परंतु महाराष्ट्रमध्ये भीतीचे वातावरण करण्याचं काम विरोधक करत आहेत. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.
केजरीवालजी आपण आपली तब्येत अन् पक्ष सांभाळा- चित्रा वाघ
सैफ अली खान प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिष्णोई गँग यांच्याशी जोडलाय. दरम्यान याचा समाचार घेताना चित्रा वाघ म्हणाला की, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेशी जे वादे केले होते, त्यांनी ते पाहावं. महाराष्ट्रच्या बाबतीत त्यांनी काळजी करू नये . महाराष्ट्रमध्ये खंबीर देवा भाऊच नेतृत्व आहे आणि देशांमध्ये मोदींचे नेतृत्व आहे. त्यामुळे आपण दिल्लीच्या बाबतीत पाहावं, किंबहुना 'केजरीवालजी आप आपनी तब्येत संभालो, अपनी पार्टी संभालो " असा खोचक टोला ही चित्रा वाघ यांनी केजरीवाल यांना लगावलाय.
हे ही वाचा