Who was Sunil Kawale : मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, सुनील कावळेंचं स्वप्न अपूर्ण, मुंबईत जीवन संपवलं!
मराठा आरक्षण आंदोलनात (Maratha resevation) सक्रीय असलेले सुनील कावळे (Sunil Kawale) यांनी मुंबईत आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला.
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनात (Maratha resevation) सक्रीय असलेले सुनील कावळे (Sunil Kawale) यांनी मुंबईत आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. मूळचे जालन्याचे (Jalna) असलेले कावळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी संभाजीनगरात राहतं. सुनील कावळे यांनी 18 ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येची माहिती राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. कावळे यांच्या आत्महत्येच्या बातमीने कुटुंबाला धक्का बसला.
"मी त्यांना विचारलं मुंबईला गाडी आणायला चालले का? ते नाही म्हणाले", असं सुनील यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. "मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आरक्षणाची मागणी करणार. मी आरक्षण घेणार म्हणजे घेणार, त्याशिवाय थंड बसणार नाही, असं सुनील कावळे म्हणत होते. सुनील कावळे रिक्षा चालवत होते. मात्र त्यांनी ते सगळं सोडून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता", असं कुटुंबीयांनी सांगितलं.
जरांगेंसोबत राहण्याचा निर्धार
नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं.
कोण होते सुनील कावळे? (Who Is Sunil Kawale)
सुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे. जालना (Sunil Kawale Jalna) जिल्ह्यातील आंबड (Ambad) तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छ. संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.
मराठा आरक्षणासाठी निस्वार्थी कार्यकर्ता त्यांना दिसला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटील यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, हा माणूस आपल्याला आरक्षण देऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. पण मनोज जरांगे आणि त्यांची भेटच झाली नाही. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती मीडियाचा गराडा आहे. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.
50 लाख आणि सरकारी नोकरीची द्या : मनोज जरांगे
दरम्यान, कावळे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखाची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी,अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
सुनील कावळे यांची आत्महत्या
दरम्यान, सुनील कावळे यांनी मुंबईत गळफास घेत आत्महत्या केली. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला. सुनील कावळे 45 वर्षांचे होते. (Sunil Kawale) मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. सुनील कावळे जालन्याचे (Sunil Kawale Jalna) रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे . मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.