एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी

बीड जिल्हा पोलीस दलातील 2023/24 या वर्षातील कामगिरी समोर आली. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हत्येच्या गंभीर गुन्ह्यात घट झाल्याचे समोर आले आहे.

बीड : राज्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन सध्या बीड (Beed) जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी असून खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. बीडचा बिहार झाल्याची टीका बीडमधील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये गेल्या वर्षभराती किती गुन्हे घडले, किती हत्या व हत्येच्या प्रयत्नाची प्रकरणे झाली हे सांगतिलं जात आहे. मात्र, बीड पोलिसांनी (Police) आता गत 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलीस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस यंत्रणा सरस ठरली असली तरी हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचंही दिसून येत आहे. 

बीड जिल्हा पोलीस दलातील 2023/24 या वर्षातील कामगिरी समोर आली. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हत्येच्या गंभीर गुन्ह्यात घट झाल्याचे समोर आले आहे. 2023 या वर्षात बीड जिल्ह्यात खुनाचे एकूण 64 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 60 गुन्हे उघड आहेत. तर 2024 या वर्षात 40 खुनाचे गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आल्याचं दिसून येतं. सध्या, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आलाय. अशातच 2024 वर्ष सरताच बीड पोलिसांनी वर्षभराचा लेखाजोखा समोर मांडलाय. ज्यात 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न या सदराखाली जिल्ह्यात एकूण 165 गुन्हे दाखल असून त्यापैकी 164 गुन्हे उघड करण्यात आले. तर 2024 या वर्षात खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकूण 191 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 190 गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यावरुन, हत्येचा प्रयत्न झाल्याचे गुन्हे 2023 च्या तुलनेत वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 

अंजली दमानियांचे गंभीर आरोप

दरम्यान, अंजली दमानिया यांनी एका वर्तमान पत्रातील बातमीचा संदर्भ देत परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत असल्याचे म्हटले. तसेच, एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. फक्त यामध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसते बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. तसेच, इकडे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तेथील आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे, म्हणूनच मी परत परत म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे, असेही दमानिया यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget