Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
अजित पवारांनी अर्थ विभागाच्या सचिवांशी बोलताना म्हटले की, आपल्या इथं शिक्षकांचे या महिन्यातील पगार झाले नाहीत का?, असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी फोनवरुन संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.
मुंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक खर्चाचा भर राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्याने विविध खात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबतची खंत देखील व्यक्त केली होती. मात्र, शासनाकडून हे फेटाळण्यात येत असून लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki bahin yojana) पैशांची तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच, या महिन्यात राज्यातील शिक्षकांच्या पगारी थांबवण्यात आल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले होते. शिक्षकांना यंदाच्या महिन्यात पगारी 2 ते 3 दिवस उशिरा मिळणार असल्याचे वृत्त होते. अद्यापही काही शाळांमध्ये शिक्षकांना पगारी न मिळाल्यासंदर्भात आज अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अजित पवार यांनी लगेच अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावला, शिक्षकांचा पगार का झाला नाही? याची पत्रकार परीषदेतूनच फोन लावून विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी अर्थ विभागाच्या सचिवांशी बोलताना म्हटले की, आपल्या इथं शिक्षकांचे या महिन्यातील पगार झाले नाहीत का?, असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी फोनवरुन संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. एसीएस फायनान्सने सांगितलं की, आपण सगळ्या विभागांना शिक्षकांच्या पगाराचे पैसे उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगाराचे वितरण करताना काही त्रुटी किंवा अंतर्गत प्रश्न असेल तो झाला असेल. त्यामुळे, विभागाने सगळ्यांचे पैसे दिले आहेत ही बाजू आता क्लेअर झाली आहे. आता, सीपींशी बोलतो, एज्युकेशन सचिवांशी बोलून त्यांना सांगतो की, हे असं राहता कामा नये, असेही अजित पवारांनी म्हटले. त्यामुळे, शिक्षकांच्या पगारांचा विषय मार्गी लागला आहे.
1 ते 5 तारखेदरम्यान होतो शिक्षकांचा पगार
दरम्यान, राज्यात 1 ते 5 तारखेदरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार होतात. पण, त्यासाठी जी सगळी कागदपत्रं असतात त्याची पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं. त्यानंतर रक्कम मिळत असते. योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद यावेळी उशिरा करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणूनच शिक्षकांचा पगार जो 1 ते 5 तारखेपर्यंत होत असतो तो उशिरानं होऊ शकतो. म्हणजेच नववर्षात 2 ते 3 दिवस उशिरानं शिक्षकांचा पगार होऊ शकतो, असे वृत्त होते. त्याच अनुषंगाने अजित पवारांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावून माहिती घेतली.
हेही वाचा
वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI