एक्स्प्लोर

Santosh Deshmukh case Ujjwal Nikam: अडथळा आणणाऱ्यांना संपवा, कायमचा धडा शिकवा! उज्ज्वल निकमांकडून कोर्टात वाल्मिक कराडच्या फोनवरील संभाषणाचा उल्लेख

Beed Crime news: मस्साजोग गावचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह अंगावर काळे-निळे वळ असलेल्या अवस्थेत सापडला होता.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बुधवारी बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी पहिल्यांदाच न्यायालयात युक्तिवाद केला. उज्ज्वल निकम यांच्यासारखा हायप्रोफाईल वकील हा खटला लढवत असल्याने आजच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले होते. ते न्यायालयात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. उज्ज्वल निकम यांनी आपल्या लौकिकाला जागत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण घटनाक्रम आणि त्याच्याशी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा असलेला थेट संबंध पहिल्याच सुनावणीत अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

आजच्या सुनावणीला वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे आणि वकिलांची टीम उपस्थित होती. यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींची ओळख परेड झाली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केस ओपन करण्याची मागणी केली. त्यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सीडीआर कोर्टासमोर सादर केला. त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी हे पुरावे आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी केली. 

उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

- आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मस्साजोग गावातील शिवारात 32 एकर जमिनीवर गोडाऊन केले.

- सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. 

- 8 ऑक्टोबर पासून खंडणी  प्रकरणाला सुरुवात. आठ ऑक्टोबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. वेळ सायंकाळी सात वाजता किती मिनिट झाली. वाल्मीक कराडने दोन कोटीची खंडणी मागणी करून काम थांबवा असे सांगितले. (या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे)

- 9 ऑक्टोबर 2024 थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याची माहिती दिली. व पोलिस तक्रार द्यावी का? अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका असे सांगितले त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही. 

- 26 नोव्हेंबर 2024 सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे. तो कराडचा निकटवर्तीय आहे. साडेअकरा वाजता तो साइटवर गेला. शिवाजी थोपटे याला धमकी दिली. कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असे सांगितले. वाल्मीक कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला. 

- 29 नोव्हेंबर 2024  सकाळी साडेअकरा वाजता वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील शिंदे यांना फोन केला. सुदर्शन घुलेने सांगितले त्या पद्धतीने काम करा. अन्यथा कंपनी बंद करा असे सांगितले. यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता. तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते. थोपटे यांनी वाल्मीक कराड यांचा आवाज ओळखला.(वाल्मीक करडांच्या आवाजाच्या नमुनाचे पुरावे) शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता. 

- 29 तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटला व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला. याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे. 

- 29 तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता. वाल्मीक कराड व इतर सर्व आरोपी विष्णू चाटे च्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन, पुरावे आहेत. 

- 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिस मध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. हा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेला वाद यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना दिली हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक  7 डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. 

- 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला सुदर्शन घुलेने फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, अशी कबुली घुले यांनी दिली आहे. (त्याचे सीडीआर आणि इतर पुरावे सादर केले आहेत)

- 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोड वर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मीक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा. (या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत)

- 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेम  साठी ही केस तयार आहे. असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला. 

वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांचा युक्तिवाद

उज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे सर्व पुरावे, कागदपत्रं मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. त्याशिवाय चार्जफ्रेम करता येणार नाही. 
 
यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश दिले. यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो, केस पुढे घेऊन जाऊ शकतो, असे म्हणणे मांडले. यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही. यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. एक तासात संपूर्ण मागणी केलेली कागदपत्रे दिले जातील, असे उज्वल निकम यांनी सांगितले. यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी वाल्मिक कराडच्या केली.  माननीय न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली.

आणखी वाचा

पहिल्याच सुनावणीत उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत समोर न आलेला गेमचेंजर पुरावा मांडला, वाल्मिक कराडचं कनेक्शन उघडं पाडलं

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना

व्हिडीओ

Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
Embed widget