एक्स्प्लोर

मोठी बातमी! साडेआठ लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याला औरंगाबादमध्ये अटक

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये लाचलुचपत विभागानं मोठी कारवाई केली आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) लाच लुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या एका मोठी कारवाईने खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे. तर लाच लुचपत विभागाने ऋषिकेश देशमुख यांना ताब्यात घेतले असून,त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.   

एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. ऋषिकेश देशमुख यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.   

काय आहे प्रकरण! 

तक्रारदार यांच्या चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधा-याचे गवळी पिंपळी ता. सोनपेठ जि. परभणी येथील कामाचे देयक 18 लाख आणि गोविंदपुर ता.पूर्णा जि. परभणी येथील कामाचे देयक 1 कोटी 19  लाख असे मिळुन दोन्ही कामाचे देयक एक कोटी 37 लाख रुपये देयक बाकी होते. हे सर्व देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे साहेब यांच्यासाठी 7.5 टक्के प्रमाणे म्हणजेच 8 लाख 3 हजार 250 आणि स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार असे एकूण 8 लाख 53 हजार 250  रुपयाची मागणी देशमुख यांनी केली होती. दरम्यान आज महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर देशमुख आणि जलसंधारण महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या भाउसाहेब दादाराव गोरे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

भूमि अभिलेख अधिकारीही अडकला जाळ्यात! 

दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत गंगापूर येथील भूमि अभिलेख विभागातील उप अधीक्षकाला लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ (वय 51 वर्ष) कार्यरत आहे. दरम्यान तक्रारदार यांची शेती मोजणी करण्यासाठी त्यांनी गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमीन मोजण्यासाठी साळोबा वेताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोडी अंती 35 हजार रुपये देण्याचं ठरलं. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर पंचा समक्ष 30 हजार रुपये घेताना साळोबा लक्ष्मण वेताळ यांना रंगेहात पकडले आहे. तर वेताळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad Abortion Case: औरंगाबाद गर्भपात प्रकरणातील धक्कादायक माहिती; मोठं रॅकेट असण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
Embed widget