एक्स्प्लोर

Shirdi Saibaba : साईंच्या पुण्यतिथीसाठी अवघी साईनगरी सजली, चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सव, भाविकांची मांदियाळी!

Ahmednagar News : दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे.

शिर्डी : दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा होणार असून आजपासूनच भक्तांची मांदियाळी साईनगरीत दिसून येत आहे. आज पहाटे काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आज पाद्य पूजा व ग्रंथ मिरवणूक पार पडली.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, दि. 23 ते गुरुवार, 26 ऑक्टोबर या कालावधीत श्रीसाईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. त्यानंतर उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रीसाईसच्चरित्र अखंड पारायणाचा श्रीगणेशा, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, रात्री पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम पडत आहेत. दरम्यान पारायणामुळे द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, कीर्तन, भिक्षा झोळी कार्यक्रम, आराधना विधी, खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, रात्री रथ मिरवणूक, शेजारती, कलाकार हजेरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून राज्यभरातून येणाऱ्या साई भक्तांना दर्शन घेतल्यावर यासाठी उद्या रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे.  मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य वेगवेगळ्या प्रतिकृती या साकारण्यात येतात. यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा व प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतेय. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी केले. 

 दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार 

दरम्यान पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने मंदिर परिसरात भव्य महाद्वार उभारले आहे. श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अवघी साई नगरी सजली असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तर या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. तसेच यातच दसरा देखील असल्याने या दिवशी सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, साईभक्तांनी दान केलेलं रक्त आता गरजूंना मोफत मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget