एक्स्प्लोर

Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू, अध्यक्ष पदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज 

Shirdi Saibaba : राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान (Shirdi Saibaba) विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Shirdi Saibaba : राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान (Shirdi Saibaba) विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी (Board of Trustees) राज्यभरातून तब्बल 539 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. हे सगळे अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यात अध्यक्ष पदासाठी 33 जणांनी तर उपाध्यक्ष पदासाठी 27 जणांनी अर्ज दाखल केले असून स्थानिकांना 50 टक्के जागा मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

शिर्डीचे साईबाबा (saibaba) हे अवघ्या जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान या देवस्थानच्या विश्वस्त पदावर वर्णी लागावी, म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. एखाद्या राजकीय व्यक्तीच राजकीय पुनर्वसन सुद्धा विश्वस्त पद देऊन अनेकदा केल जात असल्याचं सिद्ध झालं. मात्र राजकीय व्यक्तींचा होत असलेला हस्तक्षेप पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली आहे आणि त्यामुळेच साईबाबा संस्थान  (Saibaba Sansthan) विश्वस्त मंडळ बरखास्त सुद्धा झालं आहे. सध्या साईबाबा संस्थानवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहत असून राज्यात नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ पदाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. 

दरम्यान विधी व न्याय विभागाने मागवलेल्या 17 सदस्यीय विश्वस्त पदाच्या राज्यभरातून 539 जणांचे अर्ज साईबाबा संस्थानला प्राप्त झाले. हे अर्ज आता राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना 50 टक्के जागा द्याव्यात, अशी शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांची जुनीच मागणी आहे यावेळी तरी ती पूर्ण करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांनी पुढे आणली. स्थानिक प्रश्न व साईभक्तांच्या समस्या स्थानिकांना अधिक माहीत असल्याने शिर्डीच्या विकासाला जास्त प्राधान्य देता येईल, अस ग्रामस्थांच आहे. राज्यातील अनेक देवस्थानांमध्ये स्थानिक विश्वस्त असतात, तशा घटना सुद्धा त्यांनी बनवलेल्या आहेत.. सरकारने जर 50 टक्के स्थानिकांना जागा दिल्या नाही तर आम्हाला शासनाबरोबर भांडावे लागेल, आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी नेतृत्व करायला हवं, अशी मागणी 15 वर्ष विश्वस्त पदाचा अनुभव असलेल्या डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी केली आहे. 

आतापर्यंत स्थानिकांना मोजक्याच जागा देण्यात आल्या. मात्र इथे येणाऱ्या भाविकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक असल्यास त्याचा अधिक फायदा होईल. साई भक्तांच्या समस्या सोडविण्यात अधिक गतिमानता यावी, अस वाटत असेल तर स्थानिक विश्वस्त अधिक हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांनी व्यक्त केल आहे. तर जेजुरीच्या खंडोबा देवस्थानमध्ये 50 टक्के स्थानिकांना जागा न मिळाल्याने आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळाची नेमणूक करताना सरकारने स्थानिकांना डावलल तर पुन्हा एकदा सरकार विरुद्ध स्थानिक असा वाद निर्माण झाला तर नवल वाटायला नको.

अशी आहे अर्जाची आकडेवारी 

दरम्यान 17 सदस्यीय साईबाबा विश्वस्त मंडळ असून यासाठी राज्यभरातून 17 जागांसाठी 539 अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज आले आहेत. महिला कोट्यासाठी 33 अर्ज आले असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 33 अर्ज आले आहेत. विशेषीकृत ज्ञान धारणा (विधी) 53 अर्ज आले असून याशिवाय विविध कोट्यातून अनेक अर्ज दाखल झाले आहेत. 

इतर संबंधित बातम्या : 

Shirdi temple trust Dissolves : शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget