Dono Review: कसा आहे राजवीर देओल आणि पलोमाचा दोनों चित्रपट? वाचा रिव्ह्यू
Dono Review: राजवीर देओल आणि पलोमाचा दोनों हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घ्या...

अवनीश बडजात्या
राजवीर देओल, पलोमा, रोहन खुराना, कनिक कपूर, माणिक पापनेजा, आदित्य नंदा
Dono Review: राजश्री प्रॉडक्शनची एक खासियत ही आहे की, ते हृदयाला स्पर्श करणारे असे चित्रपट बनवतात. हे चित्रपट तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता. त्यांचे हम आपके है कौन,हम साथ साथ हैं हे चित्रपट अनेक जण आजही टीव्हीवर बघतात.आता राजश्री प्रॉडक्शननं दोन नवीन स्टार्स लाँच केले आहेत. सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लोंची मुलगी पलोमा ठकेरिया. हा चित्रपट राजश्रीच्या स्टाईलमध्ये तयार करण्यात आला आहे. कसा आहे राजवीर देओल आणि पलोमाचा दोनों हा चित्रपट? जाणून घ्या...
चित्रपटाची कथा
ही कथा आहे देव सराफ आणि मेघना दोशीची म्हणजेच राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लों यांची.देव आणि मेघना हे दोघेही एका लग्नात भेटतात. या लग्नात मेघनाचा एक्स-बॉयफ्रेंड येतो . अशा परिस्थितीत या दोघांमुळे या लग्नात काही अडचण येणार का? की हे दोघे नवीन सुरुवात करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर मिळणार आहेत. दोनों चित्रपटाची कथा खूप छान आहे.
कलाकारांचा अभिनय
राजवीर देओलने या चित्रपटात अतिशय नॅचरल अॅक्टिंग केली आहे.राजवीरचे वडील सनी देओल हे लाऊड अॅक्टिंगसाठी ओळखले जातात पण राजवीरने शांत व्यक्तिरेखा साकारली आहे आणि त्याची डायलॉग्स सादर करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रभावित करते. पलोमा ढिलोंनेही तिची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे साकारली आहे.तिचा अभिनयही अगदी नॅचरल वाटतो. हे दोन नवोदित कलाकार आहेत पण ते भविष्यात चांगले काम करू शकतात. चित्रपटातील सहाय्यक कलाकारही अप्रतिम आहेत. रोहन खुराणानं निखिलची भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.त्याचा स्वतःचा एक स्वॅग आहे जो तुम्हाला खळखळून हसवतो. कनिक कपरने वधू अलिनाच्या भूमिकेत उत्कृष्ट काम केले आहे. तिचा स्क्रीन प्रेझेन्सही अप्रतिम आहे आदित्य नंदाने गौरवची भूमिका उत्तर प्रकारे साकारली आहे.
कसा आहे चित्रपट?
हा चित्रपट खूपच फ्रेश वाटतो. चित्रपटामधील थायलंडचा लग्नाचा सेट अतिशय भव्य पद्धतीने दाखवण्यात आला आहे . चित्रपटात तुम्हाला सर्व नवीन चेहरे दिसतील. तुम्ही चित्रपटातील पात्रांशी जोडले जाल आणि हीच राजश्रीची खासियत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन
सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे अवनीश हा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे, असं चित्रपट बघाताना जाणवते. कारण चित्रपटात परंपरा आहे आणि चित्रपट आधुनिकही आहे. अवनीशने राजश्रीमध्ये चांगली ट्रेनिंग घेतली आहे, असं हा चित्रपट बघाताना जाणवते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
