Travel : जून महिन्यात मिळेल 'हिमस्वर्गाचा' अनुभव! उन्हाळ्यात गरमीपासून दिलासा हवा, तर भारतातील 5 हिल स्टेशन्स जाणून घ्या..
Travel : उन्हाळा ऋतू इथल्या हिल्स स्टेशनला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कारण, दरवर्षी जून-जुलै महिन्यात लोक उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतात.
Travel : सध्या भारतातील विविध भागात उष्णतेचं वाढतं प्रमाण पाहायला मिळत आहे. मान्सून सुरू व्हायला अवघे काही तासच शिल्लक असताना उष्णतेच्या लाटांनी जगणं मुश्किल केलंय, याच गरमीपासून दिलासा मिळावा यासाठी अनेक जण हिल्स स्टेशनला पिकनिक प्लॅन करतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही हिल्स स्टेशन बद्दल सांगणार आहोत. जेथे गेल्यानंतर जून महिन्यात सुद्धा तुम्हाला हिमस्वर्ग म्हणजे बर्फाळ पर्वत, निसर्गसौंदर्य पाहण्याचा आस्वाद घेऊ शकता.
भारतातील सुंदर हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करू शकता
जून-जुलैमध्ये उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक फिरायला बाहेर पडतात. उन्हाळ्यात, लोकांना अशा ठिकाणी जायला आवडते, जिथे उष्णतेपासून आराम मिळेल. अशात, तुम्ही लडाख, लाहौल आणि स्पिती व्हॅली आणि माउंट अबू सारख्या भारतातील सुंदर हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. उन्हाळा ऋतू इथल्या हिल्स स्टेशनला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कारण, दरवर्षी जून-जुलै महिन्यात लोक उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतात. या दोन महिन्यांत बहुतेक लोक सहलीला जातात आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. तुम्हालाही उन्हाळ्यात घरी बसून कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची यादी घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही तुमचा जोडीदार किंवा कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.
जून महिन्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम हिल स्टेशन्स
लाहौल आणि स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. जून महिन्यात येथे जाणे खूप चांगले मानले जाते. उन्हाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच वाढते. तसेच येथील पर्वत आणि शांतता तुम्हाला एक संस्मरणीय अनुभव देतात.
लडाख, जम्मू आणि काश्मीर
लडाख हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील उंच आणि खडकाळ पर्वतांचे सौंदर्य प्रवाशांच्या मनात घर करून जाते. जून महिन्यात लडाखला भेट देऊन तुम्ही नैसर्गिक सौंदर्य आणि बर्फाचा अनुभव घेऊ शकता.
शिमला, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील शिमलाचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांची मने जिंकते. यामुळे तुम्हाला थंडावा अनुभवण्याची संधी मिळते. उन्हाळ्यात या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते.
माउंट अबू, राजस्थान
राजस्थानचे माउंट अबू हे जून महिन्यात थंड वारे आणि आरामदायी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. हे राजस्थानचे सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
मुन्नार, केरळ
केरळ राज्यातील मुन्नार हे शहर हिरवेगार आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील सुंदर दृश्ये प्रवाशांची मने जिंकतात. जून महिन्यात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
हेही वाचा>>>
Travel : व्यस्त कामातून घ्या ब्रेक, 'इगतपुरीचे' निसर्गसौंदर्य पाहा, मनःशांतीचा अनुभव येईल, चित्रपटांच्या शूटिंगसाठी पहिली पसंत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )