Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Anc - अहिल्यानगर शहरामध्ये पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सामन्यानंतर पंचांसोबत घातलेली हुज्जत आणि पंचांना केलेली मारहाण शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना भोवली आहे या दोन मल्लांच्या कुस्तीवर तीन वर्षाची बंदी आणण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोघांच्या कुस्तीतील निर्णय पंचांनी चुकीचा दिला आणि दाद मागायला गेल्यानंतर चांगला प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्यामुळे सगळा प्रकार घडल्याचं शिवराज राक्षे यांनी म्हटला आहे एवढेच नाही तर घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील म्हटल आहे शिवराज राक्षे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी




















