Immunity Booster Food : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कंटोलाची भाजी गुणकारी; वाचा याचे फायदे
Boost Your Immunity : कंटोला या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे आढळतात. कंटोला ही भाजी जरी दिसायला कारल्यासारखी असली तरी ही भाजी कडू नसते.
Boost Your Immunity : निरोगी शरीरासाठी तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुमच्या आहारात हंगामी फळभाज्यांचा समावेश करणे फार गरजेचे आहे. कारण या फळभाज्यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. अशाच हंगामी फळभाज्यांमधील एक भाजी म्हणजे कंटोला. या भाजीला काहीजण कंटोळी म्हणतात तर काही याला कंटोला असे म्हणतात. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे आढळतात. कंटोला ही भाजी जरी दिसायला कारल्यासारखी असली तरी ही भाजी कडू नसते. कंटोलामध्ये व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे.
कंटोलामधील पोषक तत्व :
कंटोलामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळतात. कंटोलामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी1,व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी2 आणि 3, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन के, कॉपर, झिंक आढळते. म्हणजेच ही सामान्य भाजी नाही. या भाजीमध्ये शरीराला मजबूत बनवणारी सर्व जीवनसत्त्वे असतात. कंटोलाची चव खूप चविष्ट लागते. ते खाल्ल्याने प्रचंड शक्ती मिळते.
कंटोलाचे फायदे :
1. कंटोला खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सर्दी, खोकला, सर्दीची समस्याही दूर करते.
2. कंटोला खाल्ल्याने डोकेदुखी, केस गळणे, कान दुखणे, खोकला, पोटात संसर्ग होत नाही.
3. कंटोला खाल्ल्याने मूळव्याध आणि कावीळ सारखे आजारही दूर होतात.
4. हे खाल्ल्याने मधुमेहावरही खूप फायदा होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
5. अर्धांगवायू, सूज, बेशुद्धी आणि डोळ्यांच्या समस्यांवरही कंटोलाचा उपयोग होतो.
6. ताप असला तरीही तुम्ही कंटोला खाऊ शकता.
7. ब्लडप्रेशर आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यातही मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :