Job Majha: बँक ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती सुरू, 'असा' करा अर्ज
Job Majha: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट - अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता - पदवीधर
एकूण जागा - 314
वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2022
तपशील - www.bankofmaharashtra.in
मुंबई पोर्ट ट्रस्ट
विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA)
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा - 50
पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
एकूण जागा - 2
पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
एकूण जागा - 3
पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 3
पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 3
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - ATC, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई - 400010
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mumbaiport.gov.