Vaishali Samant On Marathi Industry: मराठी कलाकारांना ना PF मिळतो, ना पेंशन, सरकारनं लक्ष द्यायला हवं; गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य
Vaishali Samant On Marathi Industry: वैशाली सामंत गायिका सावनी रविंद्रच्या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाली, मराठी कलाकारांना ना PF मिळतो, ना पेंशन, याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं.

Vaishali Samant On Marathi Industry: आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra News) टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे. गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची, असं म्हणत गायिका वैशाली सामंतनं (Vaishali Samant) एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. वैशाली सामंत गायिका सावनी रविंद्रच्या (Savani Ravindra) पॉडकास्टमध्ये (Sa Va Ni Music Podcast) बोलताना म्हणाली, मराठी कलाकारांना ना PF मिळतो, ना पेंशन, याकडे सरकारनं (Maharashtra Government) गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं.
नुकतंच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रनं Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. सावनीच्या या Podcast साठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आली होती. सावनीनं आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत? असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाली की, सरकरानं आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत.
आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज : वैशाली सामंत
"आपल्या मराठी कलाकारांना PF मिळतो का? तर नाही, पेंशन मिळते का? तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकतं. थोडसं सरकारनं मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालावं. सरकारनं प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवा, त्यांचा संपूर्ण आढावा देखील घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे.", असं वैशाली सामंत म्हणाली.
"आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.", असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल, हे पाहणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
