Mahira Sharma And Mohammed Siraj Dating Rumors: माहिरा शर्मा, मोहम्मद सिराज रिलेशनमध्ये, लवकरच लग्नाचा बार उडवणार?
Mahira Sharma And Mohammed Siraj Dating Rumors: 'बिग बॉस 13' फेम माहिरा शर्मा सध्या चर्चेत आहे. ती क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे. दरम्यान, अद्याप दोघांकडूनही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Mahira Sharma And Indian Cricketer Mohammed Siraj Dating Rumors: टेलिव्हिजन स्टार (Television Star) माहिरा शर्मा (Mahira Sharma), अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसून आली आहे. पण, तिला खरी लोकप्रियता मिळाली 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) मधून. पण, सध्या हीच माहिरा शर्मा चर्चेत आली आहे ती, टीम इंडियाच्या (Team India) स्टार क्रिकेटपटू मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) प्रेमात पडल्यामुळे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, पण दोघांपैकी कुणीच याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. तसेच, दोघांकडूनही या वृत्ताचं खंडनही करण्यात आलेलं नाही.
'बिग बॉस 13' फेम माहिरा शर्मा सध्या चर्चेत आहे. ती क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे. दरम्यान, अद्याप दोघांकडूनही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी, सिराज आशा भोसले यांची 23 वर्षांची नात जानाईला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
Mahira Sharma मोहम्मद शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. या कथित जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीनं असा दावा केला आहे की, माहिरा आणि सिराज एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, माहिरा किंवा सिराज दोघांनीही अद्याप त्यांच्या डेटिंगच्या वृत्तांना अधिकृतपणे दुजोरा किंवा नकार दिलेला नाही.
तीन महिन्यांपूर्वी पसरलेली अफवा
माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या डेटिंगच्या अफवांनी पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये जोर धरला होता. त्यानंतर सोशल मीडिया युजर्स पुरते हैराण झाले होते. त्यावेळी इंस्टाग्रामवर क्रिकेटपटू मोहम्मद सिराज माहिरा शर्माचे फोटो लाईक करत असल्याचं नेटकऱ्यांनी टिपलं होतं.
पारस छाबडाला करत होती डेट
माहिरा यापूर्वी 'बिग बॉस 13'चा कंटेस्टंट पारस छाबडाला डेट करत होती. दोघांची पहिली भेट 'बिग बॉस 13'मध्येच झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात चांगली बॉन्डिंग झाली होती. पण, 2023 मध्ये ते दोघेही वेगळे झाले आणि असं सांगितलं जातंय की, जेव्हा माहिरानं पारसला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं, त्यावेळी ही बाब अनेकांच्या लक्षात आली.
पारसनं दिलेली ब्रेकअप झाल्याची माहिती
ब्रेकअपबाबत सांगताना, पारसनं ईटाइम्सला सांगितलेलं की, "हो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण झाल्यानंतर आम्ही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ एकमेकांशी बोलत नाही आहोत. पण आमच्यात नेहमीच अशा प्रकारची भांडणं होतात, अगदी बिग बॉसच्या घरात असतानाही. यामुळे ब्रेकअप होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं."
आशा भोसलेंच्या नातीशी जोडलं गेलं नाव
दुसरीकडे सिराजचं नाव काही दिवसांपूर्वीच आशा भोसलेंची नात जनाई भोसलेशी जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी जनाईची बर्थडे पार्टी पार पडली. त्यावेळी त्यांच्या डेटिंगच्या अफवा समोर आल्या होत्या. जनाई भोसलेनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत दिसून आली होती.
दरम्यान, जनाईनं लगेचच अफवा फेटाळून लावल्या आणि सिराजला 'मेरे प्यारे भैय्या' असं म्हटलं, ज्याला सिराजनंही 'मेरी बेहना' असं म्हणत उत्तर दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
