एक्स्प्लोर

Telly Masala : 'खाशाबा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स ते छोट्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी कमबॅक करताना अशोक सराफांची प्रतिक्रिया;जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव (Khashaba) यांच्यावरील चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कारण मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याचप्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहेत. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Gautami Deshpande : 'हा मुर्खपणा करायचा नाही...तुम्ही बेअक्कल आहात..', अभिनेत्री गौतमी देशपांडे मुंबईकरांच्या बेशिस्तपणावर का भडकली?

  मुंबईतील ट्रॅफिकची समस्या हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. इतकच नव्हे तर अगदी सामान्यांपासून ते मोठे कलावंत कायमच या सगळ्यावर भाष्य करत असतात. अनेकांना या ट्रफिकच्या समस्येमुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो, कामावर उशीरा पोहचणं, महत्त्वाच्या कार्यक्रमांना वेळत न पोहचणं अशा अनेक अडचणी येतात. पण खूप ट्रॅफीक असताना बरेच जण बेशिस्तपणाही करतात. याच बेशिस्तपणावर अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ashok Saraf : मी मालिका कधीच करणार नव्हतो पण..., छोट्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी कमबॅक करताना अशोक सराफांची प्रतिक्रिया

 महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे लवकरच कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'अशोक मा.मा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तसेच मालिकेचा प्रोमोही शेअर करण्यात आला होता. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अशोक सराफ हे मालिकांमध्ये कमबॅक करणार आहेत. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ranbir Kapoor:'होय मलाही मान्य पण... ', ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूरने व्यक्त केलं स्पष्ट मत

बॉलिवूडचा अभिनेता रणबिर कपूर याचा 2023 ला रिलीझ झालेला ॲनिमल चित्रपट  वादाच्या भोवऱ्यात सापडला तो  या चित्रपटात दाखवण्यात आलेली हिंसा , टॉक्सिक पुरुषत्व, हिंसाचाराच्या चित्रणासाठी तयार करण्यात आलेल्या थीम्स आणि ग्राफिकमुळे .  अभिनेता रणबिर कपूर ने ही आता ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम झाल्याचं मत नुकतच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्यक्त केलं . गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात चित्रपट आणि अभिनेत्याचा समाजभान या विषयावर तो बोलत होता.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

The Sabarmati Report on OTT: 'द साबरमती रिपोर्ट'नं OTT चं दार ठोठावलं, कुठे व कधी होणार रिलिज? पहा..

 पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहांनी कौतूक केलेला द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आता वाढली आहे.गुजरातच्या गोध्रा कांडाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या रिलिजनंतर एका दिवसाने म्हणजेच १५ नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलिज झालेली द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. द साबरमती रिपोर्ट लवकरच ओटीटीवर रिलिज होणार आहे.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 08 March 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 09 March 2025Dhananjay Deshmukh And Vaibhavi Deshmukh | सरकारचे डोळे कधी उघडणार? वैभवीचा संतप्त सवाल, तर सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार, धनंजय देशमुखांची माहितीRaj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
Embed widget