एक्स्प्लोर

The Sabarmati Report on OTT: 'द साबरमती रिपोर्ट'नं OTT चं दार ठोठावलं, कुठे व कधी होणार रिलिज? पहा..

धीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सी याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

The Sabarmati Report on OTT: पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहांनी कौतूक केलेला द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आता वाढली आहे.गुजरातच्या गोध्रा कांडाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या रिलिजनंतर एका दिवसाने म्हणजेच १५ नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलिज झालेली द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. द साबरमती रिपोर्ट लवकरच ओटीटीवर रिलिज होणार आहे.

धीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सी याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.

कोणत्या ओटीटीवर येणार द साबरमती रिपोर्ट?

उत्कंठा वाढवणारा ट्रेलर, दमदार स्टारकास्ट आणि गोध्रा कांड या वादग्रस्त विषयाभोवती फिरणारी कथा यामुळे प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच द साबरमती रिपोर्ट सिनेमाची चर्चा होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक बड्या नेत्यांनी द साबरमती रिपोर्ट सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद देत कौतूक केल्याचे दिसल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार याचं कुतुहल होतं.द साबरमती रिपोर्ट हा सिनेता ZEE 5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट कधी येणार याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी एकूण चित्रपटांचा ट्रेंड पाहिला तर चित्रपटनिर्माते थेएटरमध्ये सिनेमा रिलिज झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात ओटीटीवर सिनेमा आणतात. डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला द साबरमती रिपोर्ट प्रेक्षकांच्या स्क्रीन्सचं दार ठोठावू शकतो.  हा चित्रपट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे . रिलिज झाल्यापासून या चित्रपटाने 10 दिवसांत 18 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, असा सॅकनिल्कचा अहवाल सांगतो.

द साबरमती रिपोर्टनं बॉक्सऑफीसवर किती केली कमाई?

द साबरमती रिपोर्ट हा गुजरातच्या गोध्रामध्ये घडलेल्या साबरमती एक्सप्रेसला जाळल्याच्या घटनेभोवती फिरते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.आयोध्येवरून परतत असणाऱ्या ५९ यात्रेकरूंचा आणि प्रवाशांचा यात मृत्यू झाला होता.या घटनेने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संरचनेवर मोठा परिणाम केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget