Ranbir Kapoor:'होय मलाही मान्य पण... ', ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूरने व्यक्त केलं स्पष्ट मत
Ranbir Kapoor: 2023 मध्ये आलेला रणबीरच्या ॲनिमल चित्रपटानं समाजात नकारात्मक परिणाम केल्याच्या प्रश्नाला रणबिर कपूर स्पष्टच उत्तर दिलं, म्हणाला ..
Ranbir Kapoor: बॉलिवूडचा अभिनेता रणबिर कपूर याचा 2023 ला रिलीझ झालेला ॲनिमल चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला तो या चित्रपटात दाखवण्यात आलेली हिंसा , टॉक्सिक पुरुषत्व, हिंसाचाराच्या चित्रणासाठी तयार करण्यात आलेल्या थीम्स आणि ग्राफिकमुळे . अभिनेता रणबिर कपूर ने ही आता ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम झाल्याचं मत नुकतच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्यक्त केलं . गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात चित्रपट आणि अभिनेत्याचा समाजभान या विषयावर तो बोलत होता .
ऍनिमल आणि संजू चित्रपटांमधून हिंसाचारांने काहीही घडवून आणता येऊ शकते हा संदेश समाजात गेल्याचं सांगत एका व्यक्तीने अशा चित्रपटांना फारसं प्रोत्साहन देता कामा नये अशी कमेंट रणबीरवर केली होती .यावर उत्तर देताना मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे असं रणबिर कपूर म्हणाला .
ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम
IFFI मध्ये एका प्रश्नावर उत्तर देताना एक अभिनेता म्हणून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे चित्रपट आणणे ही आपली जबाबदारी असल्याचं सांगत ॲनिमल चित्रपटाने असे म्हटल्यावर, मी एक अभिनेता आहे, हे खूप महत्वाचे आहे की मी वेगवेगळ्या शैलींमध्ये आणि भिन्न पात्रांमध्ये देखील रंगले पाहिजे आणि विविध भूमिका साकारल्या पाहिजेत. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपण ज्या प्रकारचे चित्रपट बनवतो त्याबद्दल आपण अधिक जबाबदार असले पाहिजे.असं तो म्हणाला . पण मी वेगवेगळ्या शैलींमध्ये आणि भिन्न पात्रांमध्येही रंगले पाहिजे आणि विविध भूमिका साकारल्या पाहिजेत. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपण ज्या प्रकारचे चित्रपट बनवतो त्याबद्दल आपण अधिक जबाबदार असले पाहिजे असं उत्तर त्यानं दिलं . संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ॲनिमल या ॲक्शन ड्रामा चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाने जगभरात ₹917 कोटींचा गल्ला केला. 2023 मध्ये हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला. रणबीरच्या कारकिर्दीतला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ॲनिमलचा समावेश होतो.
रणबीरच्या भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर ' मध्ये दिसणार
रणबीर आता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. जानेवारी 2024 मध्ये या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. रणबीरकडे सध्या नितेश तिवारीचे रामायण चित्रपट असून यात त्याच्यासोबत साई पल्लवी आणि इतर दिग्गज कलाकारांनी ही काम केलंय .